Vijay Mallya loses appeal may be back in 28 days 
देश

ब्रिटन न्यायालयाचा विजय मल्ल्याला दणका; आता भारतात परतावंच लागणार

वृत्तसंस्था

लंडन : आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका असणारा उद्योगपती विजय माल्ल्या याला आता भारतात परतण्याशिवाय पर्याय उरलेला नाही. भारतात परतल्यावर अटक होईल म्हणून देशाबाहेर असलेल्या माल्ल्यानं स्वतःच्या प्रत्यार्पणाविरोधात त्याने ब्रिटनच्या उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. पण, त्याची ही याचिका फेटाळण्यात आली असून त्याला आता भारतात परतावंच लागणार आहे.

भारतासाठी हे एक मोठं यश आहे. या प्रकरणाचा निर्वाळा न्यायमूर्ती स्टिफन इरविन आणि न्यायमूर्ती एलिझाबेथ लाइंग यांनी ईमेलने दिला आहे. लिंकर किंग म्हणून प्रसिद्ध असलेला ६४ वर्षीय मद्य उद्योजक विजय माल्ल्या आता सर्वोच्च न्यायालयात जावू शकतो, त्याच्याकडे १४ दिवसांचा कालावधी आहे. जर विजय माल्ल्याने याविरोधात याचिका दाखल केली नाही, तर त्यांला २८ दिवसांच्या आत भारतात परतावेच लागेल.

विजय माल्ल्या हा मार्च २०१६ साली भारत सोडून इंग्लंडला पळून गेला होता. माल्ल्यावर बँकेचं कर्ज बुडवण्याचा आरोप आहे. माल्ल्याने किंगफिशर एअरलाईन्स कंपनीसाठी बँकांकडून कर्ज घेतलं होतं. हे कर्ज न देताच तो परदेशात पळून गेल्याचा त्याच्यावर आरोप आहे. हे कर्ज १० हजार कोटी रूपयांच्या आसपास असल्याचं सांगण्यात येतं. किंगफिशर एअरलाईन्स डबघाईत आल्याने सध्या बंद आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND A vs AUS A 2nd ODI: भारताची पुन्हा हार, ऑस्ट्रेलियाकडून शिकार! पण 'एका'ने ठोकलाय न्यूझीलंड वन डे मालिकेसाठी दावा; कोण आहे तो?

नवरा असावा तर फडणवीसांसारखा! पती अन् मुलीसमोर अमृता फडणवीसांनी सादर केलं गाणं, असं केलं बायकोचं कौतुक

Maharashtra Live News : सीईसीविरोधातील आंदोलनांप्रकरणी सात दिवसांत २७ एफआयआर दाखल

Kaygaon News : कायगाव परिसरात ऊसतोडणी हंगामाची चाहूल; ऊसतोड मजूर दाखल, मात्र दुष्काळाने उसाची वाढ खुंटली, उत्पादन घटणार

CJP Protest: दिल्ली मेट्रो बंदीवरून सुप्रीम कोर्टाने सरकारला फटकारले; सीजेपीला दिलासा; सुनावणीत काय घडलं?

SCROLL FOR NEXT