Vikas Dubey, kanpur, Vikas Dubey Killed
Vikas Dubey, kanpur, Vikas Dubey Killed 
देश

Vikash Dubey Killed: पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या कुख्यात गुंड विकास दुबेचा खात्मा;

वृत्तसंस्था

कानपूर : उत्तर प्रदेशमधील कानपूर (Kanpur) मधून मोठी बातमी आहे. यूपी एसटीएफ (UP STF) च्या पथकानं  कुख्यात गुंड  विकास दुबे (Vikas Dubey) चा खात्मा केला आहे. एसटीएफच्या ताफ्यातील ज्या वाहनातून विकास दुबेला कानपूरला नेण्यात येत होते त्याला अपघात झाला. बर्रा पोलिस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या अपघातात विकास दुबे असलेले वाहन पलटी झाले. मोक्याचा फायदा घेत विकासने पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्याला ठार केल्याचे समजते.

कानपूरमध्ये एका अधिकाऱ्यासह 8 पोलिसांची हत्या केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी विकास दुबेला मध्य प्रदेशमधील उज्जेनमधून उत्तर प्रदेशच्या कानपूरला नेण्यात येत होते. तो ज्या वाहनात होता. त्या वाहनाला अपघात झाला. यावेळी त्याने पोलिसांकडील हत्यार हिसकावून घेत पळून जाण्याचा प्रयत्न केला. या अपघातात वाहनातील दोन पोलिस कर्मचारी देखील जखमी झाले आहेत. पोलिसांनी केलेल्या गोळीबारानंतर जखमी झालेल्या विकास दुबेलाही रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषीत केले. यापूर्वी दुबेचा सहकारी असलेल्या प्रभातसह अन्य काही जणांचा पोलिसांनी खात्मा केला होता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT