मागील सरकारांनी वेळ वाया घालवला; पंतप्रधान नरेंद्र मोदी  sakal media
देश

मागील सरकारांनी वेळ वाया घालवला; पंतप्रधान नरेंद्र मोदी

उत्तराखंडमध्ये सध्या विकासकामे दुप्पट वेगाने

सकाळ वृत्तसेवा

डेहराडून : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज उत्तराखंडमध्ये अठरा हजार कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची पायाभरणी करताना भाजपच्या प्रचाराचा नारळ फोडला. सध्या देशभर रस्ते जोडणीचा महायज्ञ सुरू असून मागील सरकारांनी या देशाचा दहा वर्षांचा अमूल्य वेळ वाया घालवला होता. तीच कसर भरून काढण्यासाठी आता विकास कामांना वेग देण्यात आला असल्याचे त्यांनी सांगितले.

येथील परेड मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलताना मोदी म्हणाले, ‘‘ आज राज्यामध्ये ज्या पायाभूत सेवा प्रकल्पांची उभारणी आणि उद् घाटन करण्यात आले ते एका महायज्ञाचाच भाग आहेत. आम्ही आता ही विकासकामे दुप्पट आणि तिप्पट वेगाने पूर्ण करत आहोत.’’ केदारनाथमध्ये दिलेल्या आश्वासनांचा उल्लेख करताना ते म्हणाले की,‘‘ या विकास प्रकल्पांमुळेच हे दशक उत्तराखंडचे म्हणून ओळखले जाईल. केदारनाथ मंदिराची पुनर्बांधणी केल्याने २०१९ मध्ये मंदिराला भेट देणाऱ्या पर्यटकांची संख्या दहा लाखांवर पोचली.’’ आज ज्या प्रकल्पांची पायाभरणी करण्यात आली त्याचा सर्व क्षेत्रांना स्पर्श होणार असून त्यामध्ये दिल्ली- डेहराडून इकॉनॉमिक कॉरिडॉरचा समावेश आहे. यामुळे दोन शहरांमधील प्रवासाचा कालावधी कमी होईल, असेही मोदी यांनी नमूद केले.

एक लाख कोटींचे प्रकल्प

उत्तराखंडमधील मागील सरकारवर टीका करताना मोदी म्हणाले की, ‘‘याआधीच्या राज्यातील सरकारांनी थोडाच विकास केला होता पण केंद्र सरकारने मागील साडेसात वर्षांच्या काळामध्ये तब्बल बारा हजार कोटी रुपये खर्च केले आहेत. राज्याचा विकास हे डबल इंजिन असणाऱ्या असणाऱ्या सरकारचे ध्येय असून राज्यासाठी तब्बल एक लाख कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांना मान्यता देण्यात आली आहे.’’

प्रकल्पांची व्याप्ती

पंतप्रधान मोदींच्या हस्ते आज ज्या अकरा प्रकल्पांची पायाभरणी झाली त्यांच्यावर १५ हजार ७२८ कोटी रुपये तर अन्य सात प्रकल्पांवर २ हजार ५७३ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. दिल्ली डेहराडून आर्थिक कॉरिडॉरमुळे दोन शहरांमध्ये असलेले २४८ किलोमीटरचे अंतर हे आता १८० किलोमीटरवर येणार आहे.याच विकास आराखड्यामध्ये बद्रीनाथसाठीच्या प्रकल्पाचा देखील समावेश करण्यात आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पाकिस्तानातील कराचीत गणपती बाप्पा मोरयाचा गजर! मराठी कुटुंबाकडून साजरा केला जातो गणेशोत्सव, आरतीचा VIDEO VIRAL

Marathi News Live Updates : मुंबईत मालिका रुग्णालयात गॅस गळतीने स्फोट, दोघे होरपळले

UPI New Rule 2026 : आता २ हजारांवरील पेमेंटवर शुल्क; पेट्रोल अन् ट्रेन तिकीटासाठी किती चार्ज लागणार?

Rainfall Forecast Maharashtra : महाराष्ट्रातून पाऊस गायब होणार? हवामान विभागाचा पुढील अंदाज चिंताजनक

गणेश चतुर्थीला ओव्हलच्या मैदानात झालेली हत्तीची एंट्री अन् मग भारताने मिळवलेला ऐतिहासिक विजय; जाणून घ्या खास किस्सा

SCROLL FOR NEXT