Breaking News  Sakal
देश

उत्तर प्रदेश पर्यटन विभागाच्या उपसंचालकाची मुंबईत आत्महत्या Deputy director Vimlesh Audichya

मुंबई पोलिसांची टीम घटनास्थळी दाखल

रुपेश नामदास

उत्तर प्रदेश सरकारच्या पर्यटन विभागाच्या उप संचालकांनी मुंबईत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना मंगळवारी दुपारी घडली आहे. विमलेश औदिच्य असे या अधिकाऱ्याचे नाव असून मुंबई पोलिसांची टीम घटनास्थळी पोहोचले आहेत.

लखनौतील पर्यटन मंत्रालयात उपसंचालकपदी कार्यरत असलेले विमलेश औदिच्य हे डिसेंबरमध्ये सेवानिवृत्त होणार होते. मंगळवारी विमलेश हे मुंबईतील निवासस्थानी आले होते.

दरम्यान त्यांनी दुपारच्या सुमारास १२ व्या मजल्यावरुन उडी मारुन आत्महत्या केली. विमलेश यांनी टोकाचं पाऊल का उचलले हे अद्याप समजू शकलेले नाही.

उत्तर प्रदेशमधील स्थानिक वृत्तवाहिन्यांनी दिलेल्या वृत्तानुसार विमलेश हे विभागीय प्रमुखाकडून होणाऱ्या जाचाला कंटाळले होते.

या घटनेबाबत मुंबई पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही.

कोरोनाच्या काळात उत्कृष्ट काम

कोरोनाच्या काळात, देशव्यापी लॉकडाऊन दरम्यान मुंबईसह महाराष्ट्रात अडकलेल्या उत्तर प्रदेशातील लोकांना मदत करण्यासाठी योगी सरकारने विमलेश औदिच्य यांची निवड केली होती. विमलेश कुमार औदिच्य यांच्या आत्महत्येने सर्वांनाच धक्का बसला आहे. मात्र, पोलिसांनी सर्व बाजूंनी मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

"मॅडम, तुम्ही कम्प्लीट वुमन आहात.. सरकार येऊ द्या, तुम्हाला सीएम कोट्यातून IAS करतो'' बड्या नेत्याचे व्हॉट्सअ‍ॅप चॅट व्हायरल

IND vs AFG 2nd T20I: संजू सॅमसनने सर्वांची बोलती बंद केली, भारताच्या विजयात महत्त्वाची भूमिका बजावली! मालिका जिंकली

Pune News : बनावट प्रमाणपत्र प्रकरणात शिवाजी साळुंखेच्या दोन नातेवाइकांना अटक

Aadul Theft : आडूळ परिसरात आठवडाभरापासून चोरट्यांचा धुमाकूळ! दुकान, मंदिरांच्या दानपेट्या, बकऱ्या व कोंबड्या चोरीला; नागरिकांत भीतीचे वातावरण

IND vs AFG 2nd T20I: नितीश कुमार चमकला, अर्शदीप सिंगनेही करेक्ट कार्यक्रम केला; अफगाणिस्तानला मोजक्याच धावा करता आल्या

SCROLL FOR NEXT