Vinod Kapri Video Sakal
देश

स्वप्नांसाठी दररोज १० किमी धावून गाठतो घर, पाहा प्रेरणादायी व्हिडिओ

राष्ट्रीय पुरस्कार विजेता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विनोद कापरी यांनी आपल्या ट्वीटरवरुन कामावरुन घरी जाणाऱ्या एका १९ वर्षीय मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे.

दत्ता लवांडे

नोएडा : परिस्थीती माणसाला जगायला अन् संघर्ष करायला शिकवते असं बोललं जातं. पण परिस्थीतीला तोंड देत संघर्ष करणाऱ्या लोकांचे उदाहरणं खूप कमी वेळा पहायला मिळतात. राष्ट्रीय पुरस्कार विजेता प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक विनोद कापरी यांनी आपल्या ट्वीटरवरुन कामावरुन घरी जाणाऱ्या एका १९ वर्षीय मुलाचा व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो मुलगा कामावरुन घरी जात असताना धावण्याचा सराव करताना आपल्याला दिसत आहे.

दरम्यान त्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांना प्रदीप मेहरा नावाचा एक मुलगा धावताना दिसत आहे. मध्यरात्री १२ च्या दरम्यान हा मुलगा रस्त्यावरुन धावत जात असताना गाडीची गती कमी करुन ते त्याची विचारपूस करतात. त्या मुलाला घरी सोडतो असं विचारल्यावर तो मुलगा त्यांना नाकार देतो आणि आपण भारतीय सैन्य दलात भरती होण्यासाठी धावण्याचा सराव करत आहे आणि मी गाडीत आलो तर माझा रोजचा दिनक्रम चुकेल. धावण्यासाठी आपल्याला वेळ मिळत नाही असंही तो मुलगा त्यांना बोलताना आपल्याला दिसत आहे. तो नोएडाच्या सेक्टर १६ येथे मॅक्डोनल्ड रेस्टॉरन्टमध्ये काम करत असल्याचं सांगतोय.

विचारपूस केल्यानंतर तो उत्तराखंडमधील असल्याचं आपल्याला या व्हिडिओतून समजतं. तसेच सकाळी आपल्याला लवकर उठून स्वयंपाक करावा लागतो. तो इथे भावासोबत राहत आहे आणि त्याची आई आजारी असून तीला हॉस्पिटलमध्ये दाखल केल्याचं त्याने सांगितलं. तसंच त्यांनी त्याला आपल्या घरी जेवणासाठी ऑफर केल्यावर त्याने दुसऱ्या भावासाठी जेवण बनवायचं आहे, तो नाईट दिवटीसाठी गेलाय, मी आलो तर तो उपाशी राहील असं बोलताना आपल्याला दिसतो. बरीच विचारपूस केल्यानंतर दिग्दर्शक विनोद कापरी त्याला सांगतात की हा व्हिडिओ व्हायरल होणार आहे. त्यानंतर तो हसतो आणि म्हणतो की, ''होऊद्या. आपण चुकीचं काम थोडंच करतोय." त्यावर ते त्याचं कौतुक करतात.

दरम्यान विनोद कापरी यांनी हा व्हिडिओ शेअर करत म्हटलंय की तुम्ही जर हा व्हिडिओ बघितला तर तुमचं या मुलावर प्रेम होईल. तसंच "हेच खरं सोनं आहे' असं कॅप्शनहा त्यांनी या व्हिडिओसाठी दिलंय. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. वारंवार घरी सोडण्यासाठी मदतीची ऑफर देऊनही नकार देणाऱ्या आणि रोज १० किमी धावणाऱ्या प्रदीप मेहराचा हा प्रवास अनेकांना परिस्थीतीशी लढायला कायम प्रेरणा देत राहील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Crackdown: पुण्यात ‘चार बेस, चार टॉप’ तरीही ध्वनिप्रदूषणाचा दणदणाट; ११०० मंडळांच्या ध्वनीची नोंद, नियमभंगावर कारवाई

Nashik Dindori crime news: लखमापूरमध्ये ७० वर्षीय मंदाकिनी सोनवणे यांची हातपाय बांधून शेततळ्यात निर्घृण हत्या; गावकऱ्यांकडून सखोल चौकशी व न्यायाची मागणी

दिल्ली इमारत दुर्घटनेत दोघांचा मृत्यू, पाच जणांची प्रकृती गंभीर; नेमकी कशी घडली घटना? कारण आलं समोर

Weekly Horoscope 7 to 13 september : या आठवड्यात पाच राशींचं नशीब पालटणार; कुणाला घ्यावी लागेल काळजी? वाचा...

Pune Highway Robbery: शिरूरमध्ये एसटी बस अडवून चालक-वाहकाला मारहाण; ₹८,९६० लुटले, चौघे जेरबंद, स्कॉर्पिओ जप्त

SCROLL FOR NEXT