Vinod Tawde sakal
देश

Vinod Tawde : विनोद तावडेंकडील जबाबदारी कायम

भाजपने २४ राज्यांसाठी प्रभारी आणि सह-प्रभारींची शुक्रवारी नियुक्ती केली. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडील बिहारची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे.

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्ली : भाजपने २४ राज्यांसाठी प्रभारी आणि सह-प्रभारींची शुक्रवारी नियुक्ती केली. राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्याकडील बिहारची जबाबदारी कायम ठेवण्यात आली आहे. झारखंडचे प्रभारीपद लक्ष्मीकांत वाजपेयी यांच्याकडे तर हरियानाची जबाबदारी डॉ. सतीश पुनिया यांच्याकडे देण्यात आली आहे.

याशिवाय छत्तीसगडचे प्रभारी म्हणून नितीन नवीन यांना नेमण्यात आले आहे. रघुनाथ कुलकर्णी यांच्याकडे अंदमान आणि निकोबारची जबाबदारी राहील. बिहार आणि हरियानाचे सहप्रभारी म्हणून अनुक्रमे दीपक प्रकाश व सुरेंद्रसिंह नागर हे काम पाहतील. अशोक सिंघल यांच्याकडे अरुणाचलचे तर दुष्यंत पटेल यांच्याकडे दादर नगर हवेली व दीव दमणच्या प्रभारीपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. गोवा राज्याचे प्रभारी म्हणून आशिष सूद हे काम पाहतील.

काश्मीरचे प्रभारी व सहप्रभारी पद अनुक्रमे तरुण चुघ आणि आशिष सूद यांच्याकडे दिले आहे. कर्नाटकमध्ये राधामोहनदास अग्रवाल हे प्रभारी म्हणून तर सुधाकर रेड्डी हे सहप्रभारी म्हणून काम पाहतील. केरळमध्ये हीच जबाबदारी प्रकाश जावडेकर व अपराजिता सारंगी यांच्याकडे राहील. अन्य नेत्यांत महेंद्र सिंह (मध्य प्रदेश), डॉ. ​अजित गोपछडे (मणिपूर), अनिल अँटनी (मेघालय आणि नागालॅंड), देवेश कुमार (मिझोराम), विजयपाल तोमर (ओडिशा), निर्मलकुमार सुराणा (पदुच्चेरी), विजय रूपानी (पंजाब), डॉ. दिलीप जायसवाल (सिक्कीम), दुष्यंतकुमार गौतम (उत्तराखंड) यांचा समावेश आहे. ईशान्य राज्यांचे समन्वयक म्हणून ​संबित पात्रा तर सह समन्वयक म्हणून व्ही. मुरलीधरन यांची नियुक्ती पक्षाने केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mira Bhayandar Paryushan Controversy : भाजप आमदारांचा अजब फतवा! विद्यार्थ्यांच्या डब्यात कांदा-लसूण नको, पर्यूषण पर्व काळात पालकांना शाळेचा मेसेज, राजकीय वाद पेटला

Indian Army Success Story: शेतकरी कुटुंबातील हर्षची भरारी! वयाच्या २४व्या वर्षी भारतीय सैन्यात लेफ्टनंट; आई गृहिणी, वडील शेतकरी, मुलाची प्रेरणादायी काहाणी

Pune MPSC Student Kidnapping : धक्कादायक! पुण्यात मध्यरात्री MPSC च्या विद्यार्थ्याचे अपहरण; आरोपी काळ्या रंगाच्या गाडीत आले अन्...

Marathi News Live Updates : ओबीसी आंदोलकाच्या गाडीवर भररस्त्यात दगडफेक; हल्ल्याचा थरारक प्रकार कॅमेऱ्यात कैद

Ahilyanagar Crime: अशीही सावकारकी; दोन कोटी कर्जाचे झाले २२ कोटी, दोघांना अटक

SCROLL FOR NEXT