V. Muraleedharn, Central Minister 
देश

बंगालमध्ये पुन्हा हिंसा; केंद्रीय मंत्री मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला!

तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवर हिंसाचाराचा आरोप

सकाळ डिजिटल टीम

कोलकाता: पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक संपल्यानंतर हिंसाचाराच्या घटना घडत आहेत. यामध्ये भाजपचे नेते आणि कार्यकर्त्यांवर सातत्याने हल्ले झाल्याचं दिसून आलं आहे. हे हल्ले तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून केले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर तृणमूलने हे आरोप फेटाळून लावले आहेत. आता गुरुवारी केंद्रीय विदेश राज्यमंत्री मुरलीधरन यांच्या ताफ्यावर हल्ला करण्यात आला आहे. पश्चिम मिदिनापूरच्या पंचकुडी येथे हा हल्ला झाला आहे.

या घटनेचा एक व्हिडिओ समोर आला आहे. यामध्ये काही लोक मुरलीधरन यांच्या कारची काच फोडताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडीओ मुरलीधरन यांनी आपल्या ट्विटरवरुन पोस्ट केला आहे. यात त्यांनी लिहिलं की, "पश्चिम मिदिनापूरच्या दौऱ्यावेळी माझ्या कारवर टीएमसीच्या गुंडांनी हल्ला केला आणि कारच्या काचा फोडल्या. माझ्या खासगी स्टाफवरही हल्ला केला गेला. त्यामुळे मला आपला दौरा अर्धवटच सोडून परत यावं लागत आहे."

केंद्रीय मंत्र्यांनी शेअर केलेल्या व्हिडिओत एक व्यक्ती दांडक्यानं त्यांच्या कारवर हल्ला करताना दिसत आहे. जसा तो हल्ला करण्यासाठी पुढे येतो त्याचक्षणी मंत्री मुरलीधरन यांचा ड्रायव्हर कार रिव्हर्स घेताना दिसत आहे. ज्या ठिकाणी हा हल्ला करण्यात आला त्या ठिकाणी तृणमूल काँग्रेसचे झेंडे आणि बॅनर लावलेले दिसून आले. या हल्ल्यामध्ये केंद्रीय मंत्र्यांच्या कारची काच फुटल्याचं दिसून आलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manoj Jarange Patil: डिफेंडर कारवरून टीका; मनोज जरांगे पाटलांनी कराडच्या सभेत दिलं थेट उत्तर, म्हणाले...

Shirur Accident : पुणे-नगर रस्त्यावर अपघात; एन्डेवर चालक व दूचाकीस्वाराचा जागीच मृत्यु

समृद्धीवर १२०च्या स्पीडने गाड्या धावतात, नो पार्किंगमध्ये कंटेनर लावला, गंभीर अपघाताची शक्यता; त्या चालकावर गुन्हा दाखल, आरटीओकडून कारवाई

Viral Video : 'या' शहराच्या मातीत विखुरलय सोनं, लोक वेचून कमवाताहेत लाखो रुपये; पाहा व्हिडिओ

Eleventh Admission : अकरावी प्रवेशासाठी अंतिम संधी

SCROLL FOR NEXT