देश

Pets Mating : पाळीव कुत्र्यांनी संबंध ठेवताच दोन गट एकमेकांना भिडले; लाठीमार अन् दगडफेकही...

सकाळ डिजिटल टीम

Gandhinagar : गुजरातमधल्या गांधीनगरजवळच्या एका गावात धक्कादायक घटना घडली आहे. दोन पाळीव कुत्रे संबंध ठेवत होते, त्यामुळे गावात वाद पेटला. दोन गटांनी एकमेकांवर दगडं फेकल्याची घटना घडली आहे.

गांधीनगरच्या देहगाव तालुक्यातील पहाडिया गावातले राजेश सिंह झाला यांनी मंगळवारी राखियाल पोलिसात तक्रार दिली की, त्यांचे वडील हिंमतसिंह हे आपल्या पाळीव कुत्र्याला फिरवत होते. तेव्हा त्याचा शेजारी रतनसिंह झाला यांच्या कुत्र्याने त्यांच्या कुत्र्यासोबत संबंध ठेवण्याचा प्रयत्न केला.

तक्रारीमध्ये म्हटलंय की, रतनसिंह यांनी हिंमतसिंह यांना शिवीगाळ केली आणि दगड मारला. काही वेळातच दोन्ही गटाचे लोक जमा झाले आणि काठ्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला.

राजेश सिंह झाला यांनी पोलिसांना सांगितलं की, मारहाणीमध्ये त्याला, वडिलांना, आईला आणि चुलत्याला जखम झाली आहे. शिवाय रतनसिंह झाला ने त्याच्या कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचं तक्रारीत म्हटलंय.

दुसरीकडे रतनसिंह यांनीही राजेशसिंह आणि त्यांच्या कुटुंबातील चार सदस्यांविरोधात तक्रार दिली. तक्रारीत म्हटलंय की, आमच्या कुटुंबावर हल्ला करण्यात आला. हिंमतसिंह यांनी सगळ्यात अगोदर कुत्र्यांना वेगवेगळं करण्यासाठी त्यांच्यावर दगडं फेकली. मी त्यांना विरोध केला तर त्यांनी माझ्यावरही दगडं मारली, असं रतनसिंह यांनी म्हटलंय.

याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना ताब्यात घेतलं आहे असून इतर फरार आहेत. दोन्ही कुटुंबांमध्ये मागच्या बऱ्याच वर्षांपासून अबोला आहे. त्यातच जेव्हा कुत्र्यांनी संबंध ठेवणं सुरु केलं तर दोन्ही कुटुंबांनी एकमेकांना मारहाण केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

NCP Shiv Sena Merger In BJP : राष्ट्रवादी अन् शिवसेना भाजपमध्ये विलीन होणार, उद्धव ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

'25 व्या वर्षी मला मोठा दिसतो म्हणून मालिकेतून काढलं' करिअरबद्दल बोलताना सुबोध भावे म्हणाला...'मी खूप रडलो आणि...'

Ladki Bahin Yojana : 71 लाख लाडक्या बहिणी अपात्र, आतापर्यंत 21 हजार 300 कोटी रुपये खर्च! सरकार पैसे वसूल करणार?

Hanuman Jayanti: अयोध्येत प्रभूरामाचे दर्शन घेण्याआधी या हनुमानाचे घ्यावे लागते दर्शन ; काय आहे पहाटेच्या 'गुप्त' पूजेचे गुपित?

Gold Rate Today: ट्रम्प इफेक्टमुळे सहा दिवसांनी सोनं स्वस्त! चांदीचा भावही घसरला; पाहा आजचा ताजा भाव

SCROLL FOR NEXT