Cow Dung Wood esakal
देश

Cow Dung Wood For Holi 2023 : ज्जे बात...! खास होळीसाठी महिलांनी गायीच्या शेणापासून बनवलं ६ टन लाकूड

महिलांच्या या उद्योगाला रोजगाराची नवी संधी म्हणून बघितलं जात आहे.

सकाळ डिजिटल टीम

Viral News Cow Dung Wood For Holi : होळीमध्ये गायी शेणापासून बनवलेल्या गोवऱ्या जाळणं फार महत्वाचं आणि शुभ मानलं जातं. या मागे काही वैज्ञानिक कारणं पण आहेत. पण यापुढेही जात उत्तर प्रदेशातल्या हाथरस गावातल्या महिलांना गायीच्या शेणापासून चक्क लाकूड बनवलं आहे. होळीमध्ये मोठ्या प्रामाणात लाकूड जाळलं जातं. त्यावर पर्याय म्हणून हा नवा प्रकार उत्तर प्रदेशात समोर आला आहे. तेथील महिला गोशाळेतील शेण गोळा करून त्यापासून गोकाष्ट बनवत आहेत. सरकारी होळीसाठी या लाकडाचा वापर केला जाणार असल्याचं सांगितलं जात आहे. शिवाय अंत्यसंस्कारासाठीही याचा उपयोग केला जाणार आहे.

जिल्हाधिकारींचा पुढाकार

  • हाथरसच्या जिल्हाधिकारी अर्चना वर्मा यांनी याकामासाठी पुढाकार घेतला. महिलांच्या समुहाद्वारे पराग डेअरी इथल्या गायीच्या शेणापासून या काठ्या बनवण्यात येत आहेत.

  • यामुळे वृक्षतोड कमी होऊन धूरही कमी होणार असल्याने पर्यावरण रक्षणातही हातभार लागेल.

  • स्वयं समुहाच्यावतीने या उपक्रमाकडे महिलांसाठी नवरोजगार संधी म्हणून बघितलं जात आहे.

  • आतापर्यंत या महिलांनी ६ टनापेक्षा जास्त काठ्या बनवल्या आहेत.

असं बनवलं जातं शेणापासून लाकूड

  • यासाठी शेण २ दिवस सुकवलं जातं.

  • ओलावा कमी झाल्यावर मशीनमध्ये फिरवलं जातं.

  • काठी बनवल्यावर सुकण्यासाठी उन्हात ठेवलं जातं.

  • यातून मिळणाऱ्या रक्कमेतील ८० टक्के भाग या महिलांना दिला जाणार असल्याचं स्थानिक प्रशासनाने सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MP Train Accident : एक्सप्रेसमध्ये आगीची अफवा पसरताच प्रवाशांच्या रुळावर उड्या, दुसऱ्या ट्रेनने अनेकांना चिरडले; ५ जणांचा जागीच मृत्यू

T20 WC, IND W vs PAK W, Playing XI: हरमनप्रीत कौरने टॉसही जिंकला, पण पाकिस्तानी कर्णधाराशी हस्तांदोलन केलं की नाही?

US Iran Deal: अमेरिका-इराण कराराचा मोठा मसुदा तयार! होर्मुज स्ट्रेट खुले होणार; तेलबंदी हटणार, डीलमध्ये काय ठरलं?

Latest Live Updates Marathi: तृणमूल काँग्रेसच्या बंडखोर खासदारांनी आज दिल्लीत लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली

Waste Management: उरुळी कांचनमध्ये अत्याधुनिक घनकचरा प्रकल्पाला गती; देवस्थानकडून दोन एकर जागा

SCROLL FOR NEXT