Viral Video  esakal
देश

Viral Video : नववधूनं भर लग्नमंडपात असं काही केलं की सगळेजण पाहतच राहिले

अनेक व्हिडीओंमध्ये स्टेजवर वधू-वरांमध्ये प्रेम पाहायला मिळतं.

सकाळ डिजिटल टीम

अनेक व्हिडीओंमध्ये स्टेजवर वधू-वरांमध्ये प्रेम पाहायला मिळतं.

तुम्ही सोशल मीडियावर (Social Media)) लग्नाशी संबंधित अनेक व्हिडिओ पाहिले असतील. अनेक व्हिडीओंमध्ये स्टेजवर वधू-वरांमध्ये प्रेम पाहायला मिळतं. काही व्हिडिओ वधूच्या एन्ट्रीचे असतात, तर काही व्हिडिओ मजेशीरही असतात. हा व्हायरल व्हिडिओ (Viral Video) पाहून तुम्हीही थक्क व्हाल. खरं तर लग्नाच्या निमित्ताने नवरी मंडपातच काही तरी करू लागते, ते पाहून नवरदेवही अचंबित होतो.

या व्हिडिओमध्ये वधू तिच्या लग्नाच्या निमित्ताने मंडपातच कुंभकर्णाच्या निद्रेत झोपलेली दिसते. त्यानंतर व्हिडिओमध्ये जे दिसतं ते खूप मजेशीर आहे. व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, हॉलमध्ये वरात आली असून मंडपात लग्नसोहळा पार पडत आहे. लग्नसमारंभादरम्यान वधू-वर दोघेही बसलेले असतात. यानंतर पंडित वर आणि वधूला फेरे घेण्यासाठी घेऊन जातात.

व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, नवरदेव फेरे घेण्यासाठी उठतो, मात्र नवरी तिथे झोपलेली दिसत आहे. यावेळी नवरदेव आवाज देत आहे, तरीही नववधू गाढ झोपेतच असलेली दिसत आहे. व्हिडिओतील हे दृश्य पाहून तुम्हाला हसणं थांबवणं कठीण होईल. आपण पाहू शकता की वधू सतत झोपलेली असते आणि वर उभे राहून वधूची वाट पाहतेय.

हा व्हिडिओ एका इन्स्टाग्राम अकाऊंटवरून अपलोड करण्यात आला आहे, ज्याचे नाव wedabout आहे. हा व्हिडिओ अपलोड करण्याबरोबरच युझरने कॅप्शनमध्ये लिहिले की,"लग्नाच्या दिवशी झोपू शकतील अशा मुलींना टॅग करा" हा व्हिडिओ इतका मजेशीर आहे की आतापर्यंत 80 हजार हून अधिक लोकांनी तो पाहिला आहे. या व्हिडिओला हजारो लोकांनी लाईकही केले आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर एका युझरने कमेंट केली की,'स्वत:च्या लग्नाच्या निमित्ताने झोपी गेलेली नवरी पहिल्यांदाच पाहिली'.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pavagadh Ropeway Accident: गुजरातमधील पावगढ शक्तिपीठ येथे मोठी दुर्घटना; रोपवे तुटल्याने सहा जणांचा मृत्यू

भक्तीपासून ते व्यापारापर्यंत... गणपती विसर्जन अर्थव्यवस्थेचे आर्थिक इंजिन कसे बनते? वाचा ₹४५,००० कोटींच्या अर्थप्रवाहाची जादू!

Ganpati Visarjan 2025 Live Updates : डॉ. श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानकडून जुहू चौपाटीवर निर्माल्य गोळा करण्याचे काम

ED action on Sahara Group : सहारा ग्रुपवर 'ED'ची मोठी कारवाई; कोट्यवधींच्या घोटाळ्यात आरोपपत्र दाखल

Latest Maharashtra News Updates : 'बिडी-बिहार' वादात केरळ काँग्रेसने आपली चूक मान्य केली

SCROLL FOR NEXT