देश

Video Viral : स्वतःला जिवंत सिद्ध करण्यासाठी 102 वर्षीय वृद्धाने काढली चक्क वरात, काय आहे कारण?

सकाळ डिजिटल टीम

रोहतक जिल्ह्यातील गांधार गावातील रहिवासी दुली चंद यांना प्रशासनाने कागदपत्रांवर मृत घोषित केले.

हरियाणातील रोहतक जिल्ह्यातील १०२ वर्षांच्या एका वृद्धा वक्तीने स्वतःला जिवंत असल्याचे सिद्ध करण्यासाठी अनोखी कल्पना आखली आहे. दुली चंद नावाच्या या व्यक्तीने मी अजूनही जिवंत आहे हे सिद्ध करण्यासाठी स्वत:ची वरात काढली आहे. एका बग्गीतून ही वरात काढली असून त्यांनी असे का केले याचेही कारण रंजक आहे.

दरम्यान, हा वृद्ध व्यक्ती बॅण्डवाल्यांसहित सरकारी अधिकाऱ्यांसमोर पोहोचला. मागील काही दिवसांपूर्वी राजस्थानच्या राज्य सरकारने या वद्ध व्यक्तीला मृत घोषित केले होते. त्यामुळे प्रशासनाचा भोंगळ कारभार समोर आणण्यासाठी त्याने हे पाऊल उचलेले असल्याची चर्चा आहे.

ही घटना अशी की, रोहतक जिल्ह्यातील गांधार गावातील रहिवासी दुली चंद यांना प्रशासनाने कागदपत्रांवर मृत घोषित केले. दरम्यान, मार्चपासून त्यांची पेन्शन बंद करण्यात आली. यानंतर या वृद्ध व्यक्तीने स्वत:ला जिवंत सिद्ध करण्यासाठी एक भन्नाट कल्पना अवलंबली आहे. या वृद्ध व्यक्तीने लग्नातील नवऱ्याप्रमाणे नोटांच्या माळा गळ्यात घालत शहरातील महत्वाच्या मार्गांवर व काढली आहे. यावेळी त्यांनी राज्य सरकारकडे पेन्शन पुन्हा सुरू करण्याची मागणी केली.

आम आदमी पार्टी (आप) हरियाणा युनिटचे माजी प्रमुख नवीन जयहिंद हे दुली चंद यांच्यासोबत होते. यावेळी ते म्हणाले की, 102 वर्षीय असणारे संबंधित व्यक्ती जिवंत आहे आणि ते सिद्ध करण्यासाठी त्याच्याकडे आधार कार्ड, कुटुंब ओळखपत्र आणि बँक स्टेटमेंट आहेत. सरकारी नोंदींमध्ये दुली चंद मृत असल्याचे दाखवले जाते आणि त्यांचे वृद्धापकाळ निवृत्तीवेतन रोखून धरले जाते.

'थारा फुफा अभी जिंदा हैं'

दुली चंद आणि त्यांच्या समर्थकांनी सरकारी कार्यालयाच्या मार्गावर प्रवास करताना हातात काही फलक घेतले होते. त्यांच्यापैकी एकाने 'थारा फुफा अभी जिंदा है' असे लिहले होते. त्यांच्या भेटीच्या शेवटी दुली चंद आणि जयहिंद यांनी माजी मंत्री आणि भाजप नेते मनीष ग्रोवर यांची भेट घेतली. ग्रोव्हर यांना कागदपत्रे दाखवत त्यांनी पेन्शन बहाल करण्याची मागणी केली आहे. या घटनेमुळे प्रशासनाच्या भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ammy Virk Attacked : कॉन्सर्ट संपवून घरी परतताना प्रसिद्ध गायक एमी विर्कच्या वाहनावर धडाधड गोळ्या झाडल्या; रोल्स रॉयसची केली चाळण

Amravati Hospital Fire: व्हेंटिलेटरच्या देखभालीअभावी तीन अर्भकांचा मृत्यू; अमरावती रुग्णालयातील पाच जण निलंबित

Pune Metro: पुणे मेट्रो लाइन ३ च्या उद्घाटनाचा मार्ग मोकळा; माण ते बालेवाडी पहिला टप्पा पूर्ण, पीएमओला अहवाल, कधी हाेणार सुरु?

Wani Crime : मायेने घरात ठेवले, घासातला घास दिला; त्याच भाडेकरूने जीव घेतला...!

Roasted Poha Namkeen: डाएट करताय? मग नक्की ट्राय करा कमी तेलातले 'रोस्टेड पोहा नमकीन'; वजन कमी करण्याच्या प्रयत्नात ठरेल फायदेशीर!

SCROLL FOR NEXT