Karnataka Viral Video 
देश

Viral Video: पोलीस भरती घोटाळा! जाब विचारणाऱ्या पीडिताला पोलीस उपाधीक्षकानी लगावली कानशिलात

पोलीस उपनिरिक्षक पदाच्या भरतीमध्ये अनियमितता झाल्यानं अनेक उमेदवारांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पोलीस भरती घोटाळ्याचा जाब विचारण्यासाठी आलेल्या पीडिताला पोलीस उपाधीक्षकांनी कानाखाली मारल्याची घटना समोर आली आहे. याचा व्हिडिओ व्हायरल झाला असून यामुळं संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (Viral Video Police recruitment scam Deputy Superintendent of Police slams a victim)

कर्नाटकातील हा प्रकार असून इथल्या पोलीस उपनिरिक्षक अर्थात पीएसआय भरती प्रक्रियेत घोटाळा झाला आहे. या भरतीतील उमेदवारांनी गृहमंत्री अरगा ज्ञानेंद्र यांची भेट घेऊन आपल्याला या प्रकारामुळं किती त्रास झाला आणि अडचणींचा सामना करावा लागला याची माहिती दिली.

पण थेट गृहमंत्र्यांकडे या उमेदवारांनी तक्रार केल्यामुळं भडकलेल्या तुमाकुरुचे पोलीस उपाध्यक्ष पी. श्रीनिवासन यांनी एका उमेदवाराच्या कानशिलात लगावली. समोर अनेक उमेदवार उभे असताना त्यांना समजावण्याऐवजी त्यांनी तिथून निघून जावं यासाठी पोलिसांचा प्रयत्न सुरु होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CJI Suryakant : लडाखमध्ये नवं न्यायालय सुरू; दुर्गम भागात न्याय मिळणं होणार सोपं, CJI सूर्यकांतांचं मोठं विधान

Chhatrapati Sambhajinagar: ना होर्डिंग, ना डीजे, तरीही जयंती दणक्यात साजरी!; महावीर जयंतीनिमित्त जैन समाजाने घालून दिला आदर्श

New Rules From April 1 India : देशात आजपासून अनेक कायदे आणि नियमांत बदल होणार, डिजीटल पेमेंटसाठी कडक सुरक्षा

Latest Marathi News Live Update : हवाई दलासाठी पर्वतीय रडारची खरेदी

आनंदाची बातमी! विद्यार्थिनींना मिळणार दोन हजार विद्यावेतन: चंद्रकांत पाटील यांची घोषणा, ‘कमवा आणि शिका’ उपक्रम

SCROLL FOR NEXT