Railway 
देश

Viral Video : रेल्वे प्रवाशांची चोराला अघोरी शिक्षा! लटकलेल्या अवस्थेत...

बिहारच्या बेगुसराय इथला हा धावत्या रेल्वेतील व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : बिहारच्या बेगुसराय इथला धावत्या रेल्वेतील एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये रेल्वे प्रवाशांनी एका चोराला अघोरी शिक्षा दिली आहे. हा व्हिडिओ पाहताना तुमच्या अंगावर काटा येईल. या व्हायरल व्हिडिओवर कमेंट करताना नेटकऱ्यांनी संबंधीत प्रवाशांवर टीकास्त्र सोडलं आहे. (Viral Video Railway passenger gives harsh punishment to thief at Bihar)

रेल्वेमध्ये एका तरुणानं चोरी केल्याचं या व्हिडिओतील प्रवाशांच्या संवादावरुन समजतं. या प्रवाशांनी चोरी करणाऱ्या या तरुणाला रेल्वे पोलिसांच्या हाती देण्याऐवजी त्याला स्वतःचं शिक्षा करण्याचं ठरवलं आणि त्यासाठी त्यांनी त्याला रेल्वे डब्याच्या खिडकीबाहेर ठेऊन त्याचे हात खिडकीच्या आतून धरुन ठेवले. धावत्या रेल्वेमध्ये हा प्रकार घडल्यानं खळबळ उडाली आहे.

या व्हिडिओमध्ये शिक्षा करण्यात आलेला तरुण "माझे हात सोडू नका" अशी विनंती या प्रवाशांना काकुळतीला येऊन करताना दिसतो आहे. जर प्रवाशांनी त्याचे हात सोडले तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो. प्रवाशांनी अत्यंत अमानुषपणे ही शिक्षा दिल्यानं सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.

हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानं यामध्ये मानवाधिकाराच्या उल्लंघनाचा मुद्दा उपस्थित होऊ शकतो, असं झालं तर अशी अघोरी शिक्षा देणाऱ्या रेल्वे प्रवाशांना कायदेशीर कारवाईला सामोर जावं लागू शकतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Eliminator : राजस्थान रॉयल्सचा Qualifier 2 मध्ये 'थाटात' प्रवेश; सनरायझर्स हैदराबादचे पॅकअप! गुजरात टायन्सशी सामना

SRH vs RR Eliminator IPL 2026: शतकाचा विचार डोक्यात सुरू होता का? वैभव सूर्यवंशीची वादळी खेळीनंतर मजेशीर मुलाखत... Video

Pune Water Crisis : आचारसंहितेतून सूट मिळताच स्थायी समिती आक्रमक; पाणीटंचाई, दूषित पाणीपुरवठा व नालेसफाईवर अधिकाऱ्यांना जाब

Pune Crime: कात्रजमध्ये दोन गावठी पिस्तुलांसह तरुण अटक; भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई

YCMOU Summer Exams: यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षांना अमरावतीत एआय निगराणीची साथ

SCROLL FOR NEXT