Vishal Patil  esakal
देश

Vishal Patil: पृथ्वीराज चव्हाण CM असताना मराठा समाजाला पहिल्यांदा आरक्षण, विशाल पाटलांनी खोडला अमित शाहांचा दावा

Vishal Patil on Amit Shah: अमित शाह यांनी २०१४ मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा दावा केला. त्यांनी म्हटलं की, "आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हव. अन्यथा आरक्षण गायब होईल."

Sandip Kapde

नवी दिल्ली: आज पुण्यात भाजपचे अधिवेशन पार पडले. यावेळी बोलताना केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मराठा आरक्षणावर भाष्य केलं. "जेव्हा भाजपचं सरकार राज्यातून गेलं तेव्हा मराठा आरक्षण देखील गेलं," असं शाह म्हणाले. "जेव्हा भाजपचे सरकार येते तेव्हा मराठा आरक्षण मिळते, आणि जेव्हा शरद पवार यांचे सरकार येते तेव्हा मराठा आरक्षण गायब होते."

अमित शाह यांनी २०१४ मध्ये मराठा समाजाला आरक्षण दिल्याचा दावा केला. त्यांनी म्हटलं की, "आता पुन्हा आम्ही सत्तेत आलो आणि आरक्षण आले. त्यामुळे आरक्षणासाठी भाजपचे सरकार यायला हव. अन्यथा आरक्षण गायब होईल."

अमित शाह यांच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना खासदार विशाल पाटील यांनी त्यांचा दावा खोडून काढला आहे. पाटील म्हणाले की, "हे जगजाहीर आहे की मराठा समाजाला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना पहिल्यांदा आरक्षण दिलं. शरद पवार यांच्याकडे सर्व समाज अपेक्षेने पाहतात."

विशाल पाटील पुढे म्हणाले, "भाजपने राज्यातील प्रमुख दोन नेत्यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय. तुम्ही शरद पवार, उद्धव ठाकरे यांना टार्गेट केलं तर त्यांची सहानुभूती ही वाढत जाणार आहे. अमित शाह यांनी राजकारणाच्या पलिकडे पुण्यात बोललं पाहिजे होतं, पण दुर्दैवाने ते काहीच बोलले नाहीत. हिंदू मुस्लिम करून निवडणूक लढवण्याचा त्यांनी प्रयत्न केला, पण तो राज्यात चालला नाही."

अधिवेशनावर काय म्हणाले विशाल पाटील?

विशाल पाटील म्हणाले, "२०२४ चा अर्थसंकल्प या अधिवेशनात मांडला जाईल. अपेक्षा आहे या सरकारने जानेवारीत अर्थसंकल्प मांडला तसाच मांडला तर देशासाठी ती निराशा असेल. शेतकऱ्यांकडे पाहून अर्थसंकल्प मांडतील ही अपेक्षा आहे. महाराष्ट्राचे प्रमुख मुद्दे या अधिवेशनात मांडायचे आहेत. राष्ट्रपतींच्या अभिभाषणावर मला बोलायचं होतं मात्र ती संधी मिळाली नव्हती. या अधिवेशनात राज्याचे मुद्दे मांडण्याची संधी मिळेल ही अपेक्षा आहे. महागाई, बेरोजगारी हा देशापुढचा मुद्दा आहे."

सांगली पूर-

"असाच पाऊस सुरू राहिला तर पाण्याचा विसर्ग वाढवावा लागेल. दीड लाखापर्यंत अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे पण २० फुटाच्या पुढे पुरची पातळी गेली आहे. अधिवेशनात हा प्रश्न मी मांडणार आहे. आम्ही कर्नाटक सरकारच्या संपर्कात आहोत. राजकारणाच्या पलिकडे जाऊन यावर विचार करण्याची गरज आहे. पुन्हा पूर येऊ नये यासाठी सरकारने प्रयत्न करावा अशी आम्ही विनंती करणार आहोत," असे विशाल पाटील यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Latest Marathi News Updates : कुख्यात अमन साहू टोळीचा सदस्य सुनीलकुमारला अझरबैजानमधून भारतात परत आणण्यात यश

एकल फौज आणि विसंगतीपूर्ण हिंसा

मोठी बातमी! सततच्या पावसामुळे नुकसान झाले तरच शेतकऱ्यांना मिळणार भरपाई; सततचा पाऊस म्हणजे काय?, सोलापुरातील ‘या’ ३ तालुक्यातच अतिवृष्टी झाल्याची नोंद

Sunday Special Recipe: रविवारी सकाळी नाश्त्यात बनवा चवदार ब्रेड पिझ्झा, लगेच नोट करा रेसिपी

दैव की कर्म?

SCROLL FOR NEXT