Mallikarjun Kharge  sakal
देश

Mallikarjun Kharge : बदनामी केल्याप्रकरणी विश्व हिंदू परिषदेकडून खर्गेंना नोटीस; शंभर कोटी रुपये...

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्लीः विश्व हिंदू परिषदेच्या वतीने काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना एक नोटीस पाठवण्यात आलेली आहे. बदनामी प्रकरणी नोटीस बजावण्यात आलेली असून तब्बल शंभर कोटी रुपयांची नुकसान भरपाई देण्याची मागणी या नोटिसीद्वारे करण्यात आलीय.

कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. बजरंग दलाची बदनामी केल्याप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांना शंभर कोटी रुपयांच्या नुकसान भरपाईची नोटीस पाठवण्यात आलेली आहे.

काँग्रेसने जाहीरनाम्यात बजरंग दलावर बंदी घालण्याची घोषणा केली. याविरोधात विश्व हिंदू परिषद आक्रमक झालेलं आहे. काँग्रेस आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येतेय.

कर्नाटक निवडणूक आयोगाकडे यासंदर्भात तक्रार करण्यात आलीय. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना नोटीस पाठवण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या अडचणींमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होणार असल्याचं दिसून येत आहे.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने वातावरण पेटलेलं आहे. मल्लिकार्जून खर्गे यांनी मोदींचा उल्लेख विषारी साप असा केल्याने भाजपने देशभर वातावरण पेटवलं. मोदींनी तर काँग्रेस आपल्याला आजवर ९१ शिव्या दिल्याचं जाहीर केलं. त्याला प्रियंका गांधी यांनीही जशास तसं उत्तर दिलं. आता तर बजरंग दलावरुन वातावरण पेटलेलं आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sarvajan Pension Scheme: वृद्ध, विधवा अन् दिव्यांगांना दर महिन्याला थेट खात्यात पेन्शन; ‘सर्वजन पेन्शन योजने’साठी पात्रता काय?

Anganwadi Boxing: अंगणवाडीत बॉक्सिंगचे धडे! खेड्यातील चिमुकल्यांच्या डोळ्यात ऑलिम्पिकचे स्वप्न; महिला बॉक्सरच्या उपक्रमाची सर्वत्र चर्चा

Pension for Widows of Freedom Fighters: स्वातंत्र्यसैनिकांच्या विधवांनाही दरमहा २५ हजार पेन्शन; जाणून घ्या पात्रता अन् अर्ज प्रक्रिया

Nandini Krushak Samruddhi Yojana: गाई खरेदी अन् डेअरी व्यवसायासाठी ३१ लाखांपर्यंत सबसिडी; काय आहे 'नंदिनी कृषक समृद्धी योजना'?

Hair Growth Ladoo: दाट, लांबसडक आणि चमकदार केसांचे सिक्रेट; रोज सकाळी खा फक्त १ 'मॅजिक लाडू'!

SCROLL FOR NEXT