Vishvas Vidu Sapkal सकाळ
देश

विश्‍वास सपकाळ पेरूतील नवे भारतीय राजदूत; परराष्ट्र मंत्रालयाची घोषणा

ते सध्या परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव आहेत.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : पेरू या देशातील भारताचे राजदूत म्हणून विश्‍वास विदू सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे. ते सध्या परराष्ट्र मंत्रालयात सहसचिव आहेत. त्यांची ही नियुक्ती परराष्ट्र मंत्रालयाने केली आहे.

विश्‍वास विदू सपकाळ हे 1998 च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत. त्यांच्या नियुक्तीची माहीती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे.

(Vishvas Vidu Sapkal Appointed as Next Ambassador of India to the Republic of Peru)

याअगोदर पेरूमध्ये भारतीय राजदूत म्हणून मंदारापू सुब्बारायूडू यांनी काम केलं आहे. ते १९९४ च्या बॅचचे IFS अधिकारी आहेत. भारतीय परराष्ट्र सेवेत रूजू होण्याच्या आधी ते सार्वजनिक क्षेत्रात अभियंता म्हणून आणि भारतातील एका प्रमुख तांत्रिक विद्यापीठात व्याख्याता म्हणून काम केले.

त्यांनी दिल्लीतील परराष्ट्र व्यवहार मंत्रालय येथे मध्य युरोप विभागात उपसचिव आणि विकास भागीदारी प्रशासनाचे प्रभारी सहसचिव म्हणून काम केले आहे. जकार्ता, वॉर्सा, रोम आणि ढाका येथील भारताच्या राजनैतिक मिशनमध्येही त्यांनी काम केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी राजकीय, आर्थिक, व्यावसायिक आणि सांस्कृतिक आणि माहिती अशा कार्यालयातही काम केलं आहे.

भारत आणि पेरूमधील द्विपक्षीय संबंध, व्यापार आणि वाणिज्य, पारंपारिक औषध प्रणाली, संरक्षण, ऊर्जा, औषधनिर्माण, संस्कृती इत्यादी क्षेत्रांमध्ये वाढत असून त्यामध्ये आता वाढ होईल असं परराष्ट्र मंत्रालयाकडून सांगण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime: पुण्यात सैराटपेक्षाची भयानक घटना! प्रेमविवाह केल्याचा मनात राग, तिघांनी सलूनचं सेटर लावलं अन् तरुणावर कोयत्याने वार

Pune News: अमली पदार्थ विरोधी पथकाची माेठी कारवाई! 'कोंढवा, बिबवेवाडीतून २७ लाखांची अफू', मेफेड्रोन जप्त; दोघांना अटक

Dhule News: जोडपं गाढ झोपेत असतानाच नियतीनं डाव साधला, सुखी संसार अर्ध्यावरच संपला; धुळ्यातील दुर्दैवी घटना

DY Chandrachud: माजी CJI चंद्रचूड अजूनही सरकारी बंगल्यातच, सर्वोच्च न्यायालयाचे केंद्र सरकारला पत्र, मोठं कारण आलं समोर

परिवहन मंत्र्यांचे आदेश! 'शालेय विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या रद्द करू नयेत'; सव्वापाच लाख प्रवासाचे पास वाटप

SCROLL FOR NEXT