pm narendra modi  esakal
देश

Vishwakarma Jayanti: पंतप्रधान मोदी यांच्याकडून विश्वकर्मा योजनेचे लोकार्पण; पारंपरिक कारागिरांना मिळणार लाभ

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विश्वकर्मा जयंतीनिमित्त विश्वकर्मा योजनेचे आज लोकार्पण केले. या योजनेमुळे पांरपरिक कारागिरांना आर्थिक सहाय्य केले जाणार आहे. या योजनेमध्ये एकूण १८ प्रकारच्या कारागिरांचा समावेश करण्यात आला आहे. दिल्लीत कारागिरांच्या सभेला त्यांनी संबोधित केले. यावेळी त्यांनी योजनेची माहिती दिली.

विश्वकर्मा योजनेअंतर्गत भारतीय कारागिरांना कमी व्याजदरात कर्ज उपलब्ध करुन दिले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेल्या माहितीनुसार कारागिरांना ३ लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळेल. विशेष म्हणजे कोणत्याही बँक गॅरेंटीशीवाय हे कर्ज दिले जाणार आहे. तसेच या कर्जाचे व्याजदर अत्यंत कमी असणार आहे. त्यामुळे कारागिरांना याचा मोठा फायदा होणार आहे.

काही वेळापूर्वी माझी अनेक विश्वकर्मा बांधवांशी चर्चा झाली. यशोभूमीमध्ये कारागिरांनी अत्यंत चांगलं प्रदर्शन केलं आहे. विश्वकर्मा जयंतीच्या सर्वांना शुभेच्छा. पंतप्रधान विश्वकर्मा जयंतीची आजपासून सुरुवात करण्यात येत आहे. हाताने काम करणाऱ्या लाखो कारागिरांसाठी ही योजना आहे. या योजनेमुळे त्यांच्यात नक्कीच नवा विश्वास निर्माण होईल, असं मोदी म्हणाले.

देशातील कारागिरांचे तप आणि तपस्या आपल्याला दिसून येत आहे. यशोभूमीला सर्व कामगारांना समर्पित करतो. मोठ्या प्रमाणात विश्वकर्मा सोबती यशोभूमित सहभाग घेणार आहेत. आता भारत थांबणार नाही. भारत जगात महत्त्वाची भूमिका बजावेल, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त या योजनेचा शुभारंभ करण्यात आला.

गावागावत विविध वस्तू बनवल्या जातात. याला जगापर्यंत पोहोचण्यासाठी यशोभूमी सशक्त माध्यम बनणार आहे. भारतीय कारागिरांची कला जगासमोर ठेवली जाईल. लोकल प्रोडक्टला ग्लोबल करण्यात ही योजना मोठी भूमिका निभावेल, असं मोदी म्हणाले. पंतप्रधान मोदी यांनी वाढदिवसानिमित्त कारागिरांना हे मोठं गिफ्ट दिल्याचं बोललं जातं.

भारताच्या समृद्धीचे मूळ विश्वकर्माच आहेत. यांची समाजात खूप महत्त्वाची भूमिका राहिली आहे. त्यांच्याशीवाय रोजच्या जीवनाची कल्पना देखील केली जाऊ शकत नाही. आजही लोक माटाचं पाणी पिणे पसंत करतात. तंत्रज्ञान कोठेही गेले तरी त्यांचे महत्व कायम राहणार आहे. त्यामुळे त्यांची ओळख पुढे येणे आवश्यक आहे. आमचे सरकार त्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांची समृद्धी वाढवण्यासाठी सहयोगी म्हणून समोर आली आहे, असं ते म्हणाले.

१८ प्रकारच्या कारागिरांना लाभ

१८ प्रकारचे काम करणाऱ्या कारागिरांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे. सुतार, सोनार, मुर्तिकार, धोबी, कुंभार, लोहार अशा वेगवेगळ्या कारागिरांना याचा लाभ होणार आहे. सरकार या योजनेवर १३ हजार कोटी रुपये खर्च करणार आहे, अशी माहिती मोदींनी दिली.

कारागिरांना ३ लाखांपर्यंत कर्ज मिळणार आहे. कोणत्याही गॅरेंटीशीवाय हे कर्ज त्यांना देण्यात येईल. सुरुवातील १ लाखांचे कर्ज देण्यात येईल. कर्ज फेडण्यात आल्यास दोन लाखांपर्यंत कर्ज देण्यात येईल. या कर्जावर खूप कमी व्याजदर असेल, अशी माहिती त्यांनी दिली. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Emergency quota : रेल्वेचा मोठा निर्णय!, ‘अमृत भारत’ अन् ‘वंदे भारत स्लीपर’ ट्रेनमध्ये आता ‘इमर्जन्सी कोटा‘

सोलापूर महापालिकेत ‘स्वीकृत’साठी ‘या’ पदाधिकाऱ्यांना संधी! जागा ९ अन्‌ इच्छुक ५६७; २० फेब्रुवारीला पहिल्या सर्वसाधारण सभेत होणार घोषणा, वाचा...

Pune News : पुण्यातील बुधवार पेठेत पोलिसांची धडक कारवाई; दोन बांगलादेशी महिला ताब्यात

Pune Cyber Crime : सायबर चोरट्यांमध्ये भाजी विक्रेत्यांपासून उच्चशिक्षित बेरोजगार; ज्येष्ठाची २२ कोटी रुपयांची फसवणूक प्रकरण, आणखी चौघांना अटक

Maha Shivratri Shivling Puja : महाशिवरात्री निमित्त हिंदू पक्षाला मोठा दिलासा! ; दर्ग्याच्या आतील शिवलिंगाची पूजा करण्यास न्यायालयाची परवानगी

SCROLL FOR NEXT