Air India-Vistara Merge  
देश

Air India-Vistara Merge : टाटांचा विस्तार वाढला; 'एअर इंडिया' अन् 'विस्तारा'चं होणार विलीनीकरण

या करारानुसार सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये 2058 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

सकाळ डिजिटल टीम

Vistara Air India Merge : विस्तारा एअरलाइन्स आणि एअर इंडियाचे विलीनीकरण करण्यावर अखेर अंतिम निर्णय घेण्यात आला आहे. सिंगापूर एअरलाइन्सच्या बोर्डाने विलीनीकरणास मान्यता दिल्यानंतर यावर आज शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. मार्च 2024 पर्यंत या दोन्ही कंपन्याचे विलीनीकरण करण्याचे निश्चित केले आहे. या करारानुसार सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये 2058 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे.

हेही वाचा - दुधाच्या प्लास्टिक पिशवीचा कापलेला छोटा कोपराही घडवेल अनर्थ...

सिंगापूर एअरलाइन्सच्या बोर्डाच्या या निर्णयामुळे टाटा समूहाला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण टाटाला त्यांचे चार एअरलाईन्स ब्रँड एअर इंडिया लिमिटेडमध्ये विलीन करायचे आहेत. एअर इंडिया आणि विस्तारा एअरलाइन्सच्या विलीनीकरणाबद्दल माहिती देताना, सिंगापूर एअरलाइन्सने एका निवेदनात म्हटले आहे की, सिंगापूर एअरलाइन्सच्या बोर्डाने विलीनीकरणास मान्यता दिली असून करारानुसार, विस्ताराच्या टाटा सन्सच्या संयुक्त उपक्रमाचे एअर इंडियामध्ये विलीनीकरण झाल्यानंतर सिंगापूर एअरलाइन्सकडे एअर इंडियाच्या नवीन स्वरूपातील 25.1 टक्के भागीदारी असेल. 

सध्या सिंगापूर एअरलाइन्सची टाटा एअरलाइन्समध्ये 49 टक्के हिस्सा आहे. विलीनीकरणासाठी नियामक मान्यता मिळाल्यानंतर सिंगापूर एअरलाइन्स एअर इंडियामध्ये 250 डॉलर दशलक्ष म्हणजेच 2000 कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. सिंगापूर एअरलाइन्स आणि टाटा यांच्यात 2022-23 आणि 2023-24 मध्ये एअर इंडियाच्या वाढीच्या ऑपरेशनला निधी देण्यासाठी अतिरिक्त भांडवली गुंतवणुकीबाबतचाही एक करार झाला आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT