vyapam 
देश

व्यापम घोटाळा: CBI कोर्टाने दोषींना दंडासहित ठोठावली 7 वर्षांची शिक्षा

सकाळ डिजिटल टीम

भोपाळ: मध्यप्रदेशातील व्यापम घोटाळ्यासंदर्भात एक महत्त्वाची घडामोड समोर येतेय. सीबीआय कोर्टाने 2012 सालच्या मध्यप्रदेश पोलीस भरती चाचणी संदर्भातील 8 दोषींना प्रत्येकी 7 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावली आहे. तसेच त्यांना प्रत्येकी 10,000 रुपये दंडही ठोठावण्यात आला आहे.

मध्य प्रदेशमध्ये सरकारी नोकऱ्यांमध्ये नियुक्ती आणि वैद्यकीय अभ्यासक्रमातील प्रवेशामधील झालेल्या मोठ्या गैरव्यवहाराला व्यापम घोटाळा म्हणून ओळखलं जातं. व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापमं) या नावावरुनच या घोटाळ्याला नाव पडलं आहे. या घोटाळ्याची व्याप्ती देखील तशीच मोठी आहे. या घोटाळा प्रकरणाशी निगडीत आजवर २४ आरोपींसह घोटाळ्याशी संबंधित ४० जणांचे संशयास्पद मृत्यू झाले आहेत. तर आजवर मोठमोठ्या लोकांसह दोन हजारावर लोकांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे हा घोटाळा?

  • पात्र नसलेल्या विद्यार्थ्यांना वैद्यकीय अभ्यासक्रमास प्रवेश देणे, सरकारी नोकरीमध्ये नियुक्त्या करणे अशा गैरप्रकारांना २००९ पासून सुरुवात झाली.

  • २०१३ पर्यंत जवळपास १०२० विद्यार्थ्यांना प्रवेश परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्याचे दाखविण्यात आलं.

  • मात्र या सर्वाच्या अर्जाची छाननी केली असता एकाचाही अर्ज आढळून आला नाही, तर याच काळात १०८७ अपात्र उमेदवारांना वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देण्यात आला होता.

  • या परीक्षांना बसलेल्या विद्यार्थ्यांच्या गैरप्रकारांबाबत तक्रारी वाढल्यानंतर या घोटाळ्याला २०१३ मध्ये वाचा फुटली.

  • इंदोरमध्ये वैद्यकीय सेवा देणारे डॉ. आनंद राय यांनी हा घोटाळा उजेडात आणला.

  • मध्य प्रदेश सरकारमार्फत व्यावसायिक परीक्षा मंडळ (व्यापम) वैद्यकीय पूर्व परीक्षा 2012 साली घेण्यात आली होती.

  • मात्र, वैद्यकीय महाविद्यालयाच्या 200 हून अधिक उमेदवारांनी अशी कोणतीही परीक्षा दिली नसल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आलं होतं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Protest High Drama : निवडणूक आयोगाविरोधात आंदोलन; दिल्लीत भाजपच्या आमदाराच्या लेकीला पोलिसांकडून ताब्यात! फोटो समोर

Who is Ajinkya Shinde? : CJP च्या प्रमुख नेत्यांना दिल्लीत अटक अन् आंदोलनाची सूत्रे थेट उजनीच्या सुपुत्राकडे; कोण आहेत अजिंक्य शिंदे? अण्णा हजारे-केजरीवालांसोबत केलंय काम

गद्दार, देशद्रोही! अभिजीत दीपके अन् सौरभ दास यांचा विमानातील प्रवाशांशी वाद; नेमकं काय घडलं?

Marathi News Live Updates : ‘देशात लोकशाहीऐवजी हुकूमशाही’; प्रियांका गांधींचा मोदी सरकारवर हल्लाबोल

Pune News : दिल्लीतील आंदोलनाला पाठिंबा; शनिवार वाड्याजवळ कार्यकर्ते ताब्यात

SCROLL FOR NEXT