Political Rally Source by ANI
देश

"भारत जागा हो! कोरोना लाटेची स्थिती युद्धासारखी"; माजी लष्करप्रमुखांची कळकळीची विनंती

राजकीय सभा, धार्मिक मेळावे, शेतकरी आंदोलन यावरही त्यांनी टीकास्त्र सोडलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : माजी लष्करप्रमुख जनरल वेदप्रकाश मलिक यांनी देशातील कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे वाढत असलेल्या मृत्यूंप्रकरणी काळजी व्यक्त केली आहे. त्यासाठी त्यांनी निवडणूक सभा, शेतकरी आंदोलन आणि इतर कार्यक्रमांवर टीकास्त्र सोडलं. ट्विट करुन रविवारी जनरल मलिक यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

"कारगील युद्धातील मृत्यूंपेक्षा अधिक मृत्यू दररोज कोरोनामुळे भारतात होत आहेत. दोन महिने चाललेल्या कारगिलच्या युद्धातही इतकी जीवितहानी झाली नव्हती. आपला देश सध्या युद्धजन्य स्थितीतून जात आहे. शनिवारी १,३३८ भारतीयांचा कोरोना महामारीमुळे मृत्यू झाला. एका दिवसातील ही संख्या कारगील युद्धातील मृतांपेक्षा अडीचपटींहून अधिक आहे. देशाचं या युद्धाकडे लक्ष आहे का?" असा संतप्त सवालही जनरल मलिक यांनी विचारला आहे.

पश्चिम बंगालमधील निवडणूक रॅली आणि गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर सुरु असलेलं शेतकरी आंदोलन यावरही जनरल वेदप्रकाश यांनी टीकास्त्रा सोडलं. त्यांनी म्हटलं, सध्याच्या बिकट परिस्थितीतही देशात निवडणूक सभा, धार्मिक मेळावे, शेतकरी आंदोलनं सुरु आहेत. भारत जागा हो! अशी कळकळीची विनंतीही त्यांनी केली आहे.

देशात रविवारी दिवसभरात विक्रमी २.६१ लाख कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १.४७ कोटींवर पोहोचली. तसेच देशातील कोरोनाग्रस्तांच्या मृत्यूंची संख्या १,७७,१५० झाली आहे. यात गेल्या चोवीस तासात १,५०१ मृत्यू झाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Police Recruitment Youth Death : पोलिस भरतीवेळी धावताना सांगलीच्या 23 वर्षीय तरुणाचा दुर्दैवी अंत; 1600 मीटरची 'ती' धाव ठरली शेवटची, खाकीचं स्वप्न उराशी, पण...

Multibagger Stock: पॉवर सेक्टरचा मल्टीबॅगर! 2 रुपयांचा शेअर पोहोचला 135 वर, अडीच वर्षांत 6,750% रिटर्न; गुंतवणूकदार झाले मालामाल

वधूच्या पाळीव कुत्र्याला वराच्या कुटुंबाकडून मारहाण; वातावरण तापलं अन् थेट लग्नच रद्द झालं, कुठं घडली घटना?

बायकोला कानाखाली मारणे क्रूरता नाही! हायकोर्टाचा धक्कादायक निकाल वादाच्या भोवऱ्यात; नेमकं प्रकरण काय?

HSC Exam : कुणी फोडली १२वीची केमिस्ट्रीची प्रश्नपत्रिका? नागपूर पेपरफुटी प्रकरणात मोठा खुलासा, खासगी शिकवणीशी संबंध उघड

SCROLL FOR NEXT