Walmart Flipkart business from 15th September will go on agitations
Walmart Flipkart business from 15th September will go on agitations 
देश

'वॉलमार्ट-फ्लिपकार्ट' व्यवहाराला विरोध ; व्यापाऱ्यांचे 15 सप्टेंबरपासून आंदोलन 

पीटीआय

मुंबई, : वॉलमार्ट-फ्लिपकार्ट व्यवहाराला विरोध करण्यासाठी व्यापारी संघटना 15 सप्टेंबरपासून 90 दिवस देशव्यापी आंदोलन करणार आहेत. याचबरोबर 28 सप्टेंबरला देशव्यापी बंद करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. 

याविषयी "कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स'ने (सीएआयटी) म्हटले आहे, की वॉलमार्ट -फ्लिपकार्ट व्यवहाराला विरोध आणखी तीव्र करण्यात येणार आहे. यासाठी 28 सप्टेंबरला देशव्यापी बंद पुकारण्यात आला आहे. याचबरोबर दिल्लीतून 90 दिवसांचे देशव्यापी आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. 

वॉलमार्टने फ्लिपकार्टमधील 77 टक्के हिस्सा खरेदी करून कंपनी ताब्यात घेतली आहे. याबाबत 16 अब्ज डॉलरचा करार झाला आहे. या व्यवहारासह देशातील किरकोळ विक्री क्षेत्रात थेट परकी गुंतवणुकीला "सीएआयटी'चा विरोध आहे. या व्यवहाराला मंजुरी देण्याच्या भारतीय स्पर्धा आयोगाच्या निर्णयाविरोधात संघटनेने गेल्या महिन्यात राष्ट्रीय कंपनी कायदा अपिलीय लवादाकडे (एनसीएलएटी) याचिका दाखल केली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

S Jaishankar: ...तर पेट्रोलचे दर 20 रुपयांनी वाढले असते; परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांचे वक्तव्य चर्चेत

RTE Maharashtra: पालकांना मोठा दिलासा! RTE च्या सुधारणेला हायकोर्टाची स्थगिती; नवे नियम तुर्तास होणार नाहीत लागू

Rohit Sharma IPL 2024 : सुट्टी नाही! मेगा लिलावासाठी रोहितला खेळावेच लागणार... माजी विकेटकिपरने कोणते संकेत दिले?

Share Market Closing: शेअर बाजाराने पुन्हा केली निराशा; मिडकॅप-स्मॉलकॅपमध्ये मोठी घसरण, गुंतवणूकदारांचे नुकसान

Naresh Goyal News : जेट एअरवेजचे चेअरमन नरेश गोयल यांना मोठा दिलासा! अखेर हायकोर्टाकडून जामीन मंजूर

SCROLL FOR NEXT