देश

Waqf Board: ‘वक्फ’च्या पहिल्याच बैठकीमध्ये वादंग; एकाच वकिलाच्या युक्तिवादास अध्यक्षांचा विरोध

सकाळ वृत्तसेवा

नवी दिल्लीः वक्फ मंडळ सुधारणा विधेयकाची छाननी करण्यासाठी नेमण्यात आलेल्या संयुक्त संसदीय समितीच्या (जेपीसी) आजच्या बैठकीमध्ये प्रचंड गदारोळ झाला. तब्बल नऊ तास चाललेल्या आणि एकाच वकिलाने ‘जेपीसी’समोर दोन वक्फ मंडळांची बाजू मांडण्याला अध्यक्ष जगदंबिका पाल यांनी कडाडून विरोध दर्शविला. यामुळे संतप्त झालेल्या विरोधी पक्षांनी सभात्यागाचे अस्त्र उपसल्याने आजची बैठक वादळी ठरली. भाजपचे खासदार जगदंबिका पाल हे संयुक्त संसदीय समितीचे अध्यक्ष असून या समितीत लोकसभा आणि राज्यसभेच्या खासदारांचा समावेश आहे.

वक्फ मंडळाचे प्रशासकीय अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देणाऱ्या तसेच वक्फ मंडळावर बिगर मुस्लिम सदस्यांच्या नेमणुकीची मुभा देणाऱ्या तरतुदींवरून दुरुस्ती विधेयकाला विरोधी पक्षांकडून जोरदार विरोध केला जात आहे. त्यापार्श्वभूमीवर ‘जेपीसी’च्या आजच्या बैठकीमध्येही पुन्हा एकदा विरोधकांकडून हा मुद्दा लावून धरण्यात आला.

वक्फ मंडळांना न्यायालयीन अधिकार देणारी कायदेशीर तरतूद नव्या विधेयकातून हटविण्यावरूनही विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला. केंद्र सरकारने आणलेल्या दुरुस्ती विधेयकावर बाजू मांडण्यासाठी आज समितीसमोर मुंबईतील ‘ऑल इंडिया सुन्नी जमायतुल उलेमा’, दिल्लीतील ‘इंडियन मुस्लिम फॉर सिव्हिल राईट्स’ तसेच उत्तर प्रदेशातील ‘सुन्नी सेंट्रल वक्फ बोर्ड’ आणि राजस्थानातील ‘मुस्लिम वक्फ बोर्ड’ या संघटनांना बोलाविण्यात आले होते.

यामध्ये मुंबईतील संघटनेची बाजू मांडणाऱ्या वकिलांनीच पुन्हा राजस्थानातील वक्फ बोर्डाची बाजू मांडण्यासाठी हजेरी लावल्याने ‘जेपीसी’चे अध्यक्ष जगदंबिका पाल भडकले आणि त्यांनी या वकिलांना बाहेर जाण्याचे आदेश दिले. एकच वकील दोन वेगवेगळ्या संघटनांचे प्रतिनिधित्व करताना वेगळे मुद्देही उपस्थित करू शकतो असा युक्तिवाद विरोधी पक्षांच्या खासदारांचा होता. यावरून जोरदार खडाजंगी होऊन कॉंग्रेसचे नासिर हुसेन, ‘एमआयएम’चे असदुद्दीन ओवेसी, ‘आप’चे संजयसिंह, ‘द्रमुक’चे ए. राजा, शिवसेना- उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे अरविंद सावंत, तृणमूल कॉंग्रेसचे नईमुल हक आणि अन्य विरोधी खासदारांनी सभात्याग केला.

मलंगगडावरील ताबा सोडाः शिवसेना
सत्ताधारी आणि विरोधी पक्षांच्या खासदारांमध्ये जोरदार जुंपली होती. या बैठकीत एमआयएमचे खासदार ओवेसी आणि भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांच्यात शाब्दिक चकमक झाली. तत्पूर्वी, भाजप खासदार दिलीप सैकिया आणि आपचे खासदार संजय सिंह यांच्यातही जुंपली होती. दरम्यान, वक्फ मंडळांवर बिगर मुस्लिम सदस्य नको हा विरोधकांचा आक्षेप खोडून काढताना शिवसेनेचे खासदार नरेश म्हस्के यांनी कल्याण जवळच्या मलंगगडावर हिंदूपद्धतीने पूजाअर्चा होत असताना मुस्लिम समुदाय तेथील हक्क का सोडत नाही? असा सवाल केल्याचे सूत्रांनी सांगितले. समितीची पुढील बैठक ५ आणि ६ सप्टेंबरला होणार आहे. दर आठवड्याला बैठक व्हावी असा अध्यक्ष जगदंबिका पाल यांचा आग्रह आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Student Agitation : एमपीएससी विद्यार्थ्यांचा रविवारी एल्गार! एसएम जोशी पुलावर ठिय्या आंदोलनाचा इशारा

National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणी सोनिया गांधी, राहुल गांधींचं दिल्ली उच्च न्यायालयात उत्तर; ईडीच्या कारवाईवर घेतला आक्षेप

Pune News : पाझर तलावांचा साठा घटला; पाणी उपशावर निर्बंध, झेडपीच्या जलव्यवस्थापन समितीकडून अधिकाऱ्यांना निर्देश

Modi Cabinet: उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार? मोदींची दोन दिवसीय चिंतन बैठक कशासाठी?

हा तर दरोडा! कॅन्सरच्या २७०० रुपयांच्या औषधाची MRP २७ हजार, रुग्णांच्या लुटीवर अधिकारी गप्प का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल

SCROLL FOR NEXT