delhi High Court  
देश

High Court: बुरख्याशिवाय पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आलं; मुस्लीम महिलेने केली तक्रार, हायकोर्ट म्हणालं..

Taken to the police station without a burqa: बुरखा घातलेला नसताना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये नेलं असं म्हणत एका मुस्लीम महिलेने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती

कार्तिक पुजारी

नवी दिल्ली- बुरखा घातलेला नसताना पोलिसांनी पोलीस स्टेशनमध्ये नेलं असं म्हणत एका मुस्लीम महिलेने दिल्ली हायकोर्टात धाव घेतली होती. महिलेच्या तक्रारीप्रकरणी हायकोर्टाने महत्त्वाची टिप्पणी केली आहे. कोर्टाने याप्रकरणी दिल्ली पोलिसांना कोणतेही निर्देश न देण्याचा निर्णय घेतला आहे. (was taken to the police station without a burqa Muslim woman complained delhi High Court comment)

एका मुस्लीम महिलेने तिला बुरख्याशिवाय पोलीस स्टेशनमध्ये नेण्यात आल्याचा आरोप केला आहे. तसेच पोलीस स्टेशनमध्ये तिची परेड काढण्यात आल्याचंही महिला म्हणाली आहे. याप्रकरणी न्यायमूर्ती स्वर्ण कांत शर्मा यांनी पोलिसांना कोणतेही निर्देश न देण्याचा निर्णय घेतलाय. पोलिसांनी अधिक संवेदशील व्हावं यासाठी कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती.

हायकोर्ट काय म्हणालं?

बार अँड बँचच्या रिपोर्टनुसार, याचिकाकर्ता महिलेने मागणी केली होती की, ज्या महिला धार्मिक प्रथा आणि स्वत:च्या आवडीनुसार बुरखा किंवा तत्सम पर्दा करतात. त्यांच्याप्रति पोलिसांना संवेदनशील केलं जावं. हायकोर्टाने यावर महत्त्वाची टिप्पणी केली. कोर्ट म्हणालं की, पोलीस तपासामध्ये गोपनीयतेला काहीही स्थान नाही. सुरक्षा आणि न्याय मिळवून देण्यासाठी व्यक्तीची ओळख महत्त्वाची आहे.

न्यायमूर्तींनी पुढे म्हटलं की, धार्मिक प्रथा किंवा व्यक्तिगत आवड असे कारण पुढे करुन गोपनीयतेला स्थान दिल्यास त्याचा चुकीचा फायदा घेतला जाऊ शकतो. यामुळे पोलिसांच्या तपासामध्ये अडथळा निर्माण होऊ शकतो. दिल्ली हायकोर्टाने महिलेची याचिका फेटाळून लावली आहे.

नेमकं काय प्रकरण?

रेशमाच्या तीन भावांनी दोन व्यक्तींना मारहाण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी रेशमाला पोलीस स्टेशनमध्ये नेलं होतं. पोलिसांच्या दाव्यानुसार, मारहाणीच्या घटनेदरम्यान रेशमा बाल्कनीतून सर्व काही पाहत होती. त्यावेळी तिने तोंड झाकले नव्हते. पोलिसांचा असाही दावा आहे की, स्वत: रेशमाने पोलीस स्टेशनमध्ये नेण्याची मागणी केली होती. कारण, दिला प्रतिहल्ल्याची भीती होती.

रेशमाच्या वकिलांनी कोर्टात दावा केला की, पोलिसांनी बळजबरीने रेशमाला चांदनी महल पोलीस स्टेशनमध्ये नेलं. रेशमा ही पर्दा करणारी महिला आहे हे पोलिसांना माहिती होतं. तरी देखील दिला पर्दा करण्यास वेळ देण्यात आला नाही. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nirgudsar Theft : बंद घरावर चोरट्यांचा डल्ला; २८ ग्रॅम वजनाचे सोन्याचे मंगळसूत्र आणि १५ हजार रुपये रोख रक्कम नेली चोरून

TMC rebels join BJP: 'तृणमूल'चे १७ बंडखोर खासदार भाजपच्या वाटेवर? NCPI नेत्याचं धक्कादायक विधान

Marathi News Live Updates : पुण्यात पाच मानाच्या गणपतीसह प्रमुख गणपती मंडळांची प्राणप्रतिष्ठा

रेल्वेत कुटुंबियांसोबत बसण्यासाठी सीट बदलता येते का? जाणून घ्या रेल्वेचा नियम...

LONG LIFE HOROSCOPE: या’ 6 राशींच्या लोकांना मिळतं दीर्घायुष्याचं वरदान? 100 वर्षांनंतरही राहतात निरोगी, ज्योतिषशास्त्रात काय आहे कारण?

SCROLL FOR NEXT