pulwama attack 
देश

Pulwama Attack : मलिकांच्या आरोपाप्रमाणे पुलवामा हल्ल्याकडे दुर्लक्ष झालं का? मोदी तेव्हा काय करत होते?

Sandip Kapde

पुलवामा दहशतवादी हल्ल्याबाबत केंद्र सरकारने निष्काळजीपणा केल्याचा आरोप करत विरोधी पक्षांनी मोदी सरकारला घेरले आहे. राहुल गांधींपासून ते काँग्रेस नेत्यांपर्यंत सर्वांनी जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांची मुलाखत शेअर केली आहे. मलिक यांनी द वायरला मुलाखत दिली. या मुलाखतीने राजकीय वर्तुळात मोठा गदारोळ उडाला आहे.

विशेष म्हणजे मलिक यांच्या आरोपांवर सरकारने मौन बाळगले आहे. भाजपचे नेते किरकोळ मुद्द्यांवर विधाने करत असले तरी मलिकवर सगळेच गप्प आहेत. सत्यपाल मलिक यांनी म्हटले आहे की, फेब्रुवारी २०१९ चा पुलवामा दहशतवादी हल्ला, ज्यामध्ये ४० जवान शहीद झाले. हा नरेंद्र मोदी सरकारच्या “अक्षमता” आणि मोठ्या गुप्तचर यंत्रणेच्या अपयशाचा परिणाम होता.

मलिकांच्या या आरोपामुळे नरेंद्र मोदींच्या कार्यक्षमतेवर देखील प्रश्न उपस्थित होत आहेत. पुलवामा हल्ला झाला तेव्हा मोदी एका कार्यक्रमाचे शुट करत होते. विरोधकांनी मोदींर आरोप केले आहेत. पुलवामा दहशतवादी हल्ल्याच्या वेळी नरेंद्र मोदी डिस्कव्हरी टीव्ही शोच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते.

पुलवामा येथे लष्कराचे ४० जवान शहीद झाले तरी देखील उत्तराखंडच्या दौऱ्यात असलेल्या पंतप्रधान मोदींनी शूटिंग पूर्ण केले, असा हल्ला झाल्यानंतरही काँग्रेसने हा मुद्दा उपस्थित केला होता. एवढेच नाही तर हल्ल्यानंतरही त्याने हे शूटिंग सुरू ठेवले.

मोदींच्या शुटबाबत शोचे होस्ट बेअर ग्रिल्स यांनी एक व्हिडिओ ट्विट केला होता. या ट्विटला रिट्विट करत काँग्रेसच्या प्रवक्त्या शमा मोहम्मद म्हणाल्या, "जेव्हा पुलवामामध्ये ४४ सीआरपीएफ जवान शहीद झाले, तेव्हा पंतप्रधान मोदी या कार्यक्रमाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते. ते इतका एन्जॉय करत होते की या घृणास्पद घटनेनंतरही त्यांनी शुटींग चालू ठेवले. ट्रेलरमध्येही तो बेफिकीरपणे हसताना दिसत आहे."

१४ फेब्रुवारीला झालेल्या या हल्ल्यानंतर काही दिवसांनी काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली विरोधकांनी यासाठी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला होता. यादरम्यान त्यांनी सांगितले होते की, या दहशतवादी हल्ल्यात जवान शहीद झाले तेव्हा पंतप्रधान मोदी एका चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त होते.

shama mohamed

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT