INA Market Delhi Fire Esakal
देश

Watch Video: दिल्लीत आणखी एक दुर्घटना, INA मार्केटमधील दुकानांना आग; व्हिडिओ व्हायरल

INA Market: आयएनए मार्केटमध्ये एका फास्ट फूडच्या दुकानाला आणि रेस्टॉरंटला आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी हजर आहेत.

आशुतोष मसगौंडे

आयएनए मार्केटमध्ये एका फास्ट फूडच्या दुकानाला आणि रेस्टॉरंटला आग लागली. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी हजर आहेत. काही लोक जखमी झाल्याची बातमी आहे.

दिल्ली अग्निशमन दलाचे अधिकारी मनोज मेहलावत म्हणाले, "चायनीज फूड कॉर्नर आणि रेस्टॉरंटला आग लागली आहे. ही आग पहाटे 3.20 च्या सुमारास लागली. 7-8 अग्निशमन दल घटनास्थळी आहेत. यामध्ये फास्ट फूड कॉर्नरच्या मालकासह 5-6 जणांना भाजले आहेत. आग आणखी वाढू शकली असती पण त्यावर वेळीच नियंत्रण मिळवल्याने पुढील दुर्घटना टळली."

दिल्लीतील इंडिया गेटजवळील पंडारा रोड मार्केटमधील प्रसिद्ध व्हेज गुलाटी रेस्टॉरंटमध्येही बुधवारी भीषण आग लागली होती. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून उपहारगृहातील काही फर्निचर व इतर साहित्य जळून खाक झाले होते.

दरम्यान दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सतत काही ना काही दुर्घटना घडत आहेत. नुकतेच ओल्ह राजेंद्र नगरमधील एका कोचिंग सेंटरच्या लायब्रररीमध्ये 12 फुट पाणी शिरल्याने तिघांचा मृत्यू झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

US and Israel Strike Iran: अमेरिकेचे इराणवर हल्ले का? नेमकं भांडण काय… जगाला तिसऱ्या महायुद्धाची भीती का वाटते? सोप्या शब्दात समजून घ्या

Ranji Trophy: इतिहास घडला! जम्मू-काश्मीर ठरले नवे चॅम्पियन; केएल राहुल, मयंक अगरवाल, पडीक्कलच्या कर्नाटकला दिली मात

Israel-US-Iran War: सोनं आणखी महागणार? इस्रायल-इराण युद्ध पेटलं! भारतातील शेअर बाजार आणि पेट्रोलच्या किमतींवर काय परिणाम?

Kolhapur - Ratnagiri : कोल्हापूर–रत्नागिरी घाटमार्गांना मिळणार वेग; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्पष्ट आदेश

Donald Trump : इस्रायलच्या हल्ल्याला अमेरिकेची साथ; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, ''इराण कधीही...''

SCROLL FOR NEXT