देश

Video : अन् बघता बघता ब्रिटनच्या पंतप्रधानांनी मारला जेसीबीतून फेरफटका

सकाळ डिजिटल टीम

पंचमहाल : दोन दिवसीय भारत दौऱ्यावर असलेले ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी गुरुवारी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांच्यासह गुजरातमधील हलोल GIDC पंचमहाल येथील जेसीबी कारखान्याला भेट दिली. तत्पूर्वी जॉन्सन यांनी उद्योगपती गौतम अदानी यांची अहमदाबाद शहराच्या बाहेरील शांतीग्राम येथील अदानी समूहाच्या जागतिक मुख्यालयात भेट घेत चर्चा केली.

जॉन्सन भेट देणारे पहिले ब्रिटिश पंतप्रधान

"@BorisJohnson, गुजरातमधील अदानी मुख्यालयात भेट देणारे पहिले बिटनचे पंतप्रधान आहेत. अदानी यांच्यासोबत पार पडलेल्या भेटीदरम्यान, जॉन्सन यांनी अक्षय ऊर्जा, हरित H2 आणि नवीन ऊर्जा यावर लक्ष केंद्रित करून हवामान आणि शाश्वतता अजेंड्याला पाठिंबा दिला. याशिवाय संरक्षण आणि एरोस्पेस तंत्रज्ञानावरील सह-निर्मिती करण्यासाठी ब्रिटनच्या कंपन्यांसोबत काम करेल. अशा भावना हॅशटॅग #AtmanirbharBharat, वापर अदानी यांनी ट्वीट करत व्यक्त केल्या आहेत.

दरम्यान, जॉन्सन आणि अदानी यांच्या भेटीदरम्यान, इतर महत्त्वाच्या गोष्टींबरोबरच ऊर्जा संक्रमण, हवामान, एरोस्पेस आणि संरक्षण सहयोग यासारख्या महत्त्वाच्या क्षेत्रांवरही चर्चा केल्याचे सूत्रांनी सांगितले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR Live IPL 2024 : सूर्यकुमार यादवचं अर्धशतक, मुंबईनेही मारली शतकी मजल

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT