Rafeal.gif
Rafeal.gif 
देश

व्हिडिओ: राफेलचे खास अंदाजातील स्वागत तुम्ही पाहिलं का?

वृत्तसंस्था

नवी दिल्ली-  राफेल विमानांची पहिली तुकडी आज भारतात दाखल झाली. फ्रान्समधून 7 हजार किलोमीटरचं अंतर कापत 5 राफेल लढाऊ विमाने भारताच्या अंबाला हवाई तळावर पोहोचली. यावेळी खास पद्धतीने राफेलचे स्वागत करण्यात आले आहे. राफेल विमानाने अंबाला हवाईतळावर उतरताच त्यांना वॉटर सल्यूट देण्यात आला. राफेल विमानांच्या दोन्ही बाजूंनी पाण्याची फवारणी करण्यात आली होती. याचा व्हिडिओ भारतीय हवाई दलाने पोस्ट केला आहे. हवाईदल प्रमुख आरकेएस भदोरिया विमानांच्या आगमनावेळी अंबाला हवाई तळावर उपस्थित होते. 

सोन्यात गुंतवणूक करायची हीच ती वेळ; वाचा सविस्तर बातमी
राफेल विमानांचा भारतीय हवाई दलाच्या 17 व्या स्क्वॅड्रोन म्हणजेच 'गोल्डन अॅरो'मध्ये समावेश करण्यात येणार आहे. राफेल विमानांच्या आगमनाने अंबाला तळामध्ये आता तीन लढाऊ स्क्वॅड्रोन झाले आहेत. या आधी अंबाला येथे जॅग्वार स्क्वॅड्रोन आहेत. भारतील वायूदलातील अंबाला हवाईतळ सगळ्यात जूने आहे. शिवाय या वायूतळाच्या मागे मोठा इतिहास असून धोरणात्मकदृष्या या तळाला फार महत्व आहे.

विमानांच्या आगमनाच्या पार्श्वभूमीवर अंबाला येथे कडक सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. हवाईतळाच्या आजपासच्या चार गावात कलम 144 लागू करण्यात आला आहे. त्यानुसार चारपेक्षा अधिक लोकांना एकत्र जमण्यास मनाई करण्यात आली आहे. लोकांना घराच्या गच्चीवर जमा होणे, फोटो काढणे किंवा व्हिडिओ काढण्यास मनाई करण्यात आली आहे. हलाई तळाच्या 3 किलोमीटरच्या परिसरात ड्रोन दिसल्यास त्यावर कारवाई करण्यात येणार आहे. संध्याकाळी जळत्या मेणबत्या हातात घेऊन राफेलचे स्वागत करण्याचे आवाहन स्थानिक आमदाराने केले आहे.

राज्यात दहावीचा निकाल लागला ९५ टक्के : यंदाही मुलींनीच मारली बाजी
भारताने फ्रान्ससोबत 36 विमाने खरेदी करण्याचा करार केला आहे. यातील पहिल्या टप्प्यात 5 विमाने भारतात दाखल होत आहेत. आतापर्यंत 12 लढाऊ विमानाच्या वैमानिकांनी  फ्रान्समध्ये राफेल लढाऊ विमानाचे प्रशिक्षण घेतले असून आणखी काही वैमानिकांना प्रशिक्षण दिले जात आहे. भारत आणि फ्रान्स यांच्यात सामंजस्य करारान्वये दोन्ही देशांतील एकूण 36 हवाई दलाच्या वैमानिकांना एविएटर्स द्वारा राफेल लढाऊ विमानाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. फ्रान्समध्ये राफेल विमानाचे प्रशिक्षण पूर्ण केलेला भारतीय हवाई दलातील वैमानिक भारतामध्ये सराव करतील.

पहिल्या टप्प्यात फ्रान्सकडून 10 राफेल लढाऊ विमाने देण्यात येणार होती. पण अन्य विमाने तयार नसल्यामुळे सध्या 5 विमाने भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात सामील करण्यात येणार आहेत.  2 जून रोजी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फ्रान्सच्या संरक्षण मंत्र्यांशी दूरध्वनीवरुन संवाद साधला होता. यावेळी फ्रान्सचे संरक्षण मंत्री फ्लोरेंस पार्ले यांनी कोरोना विषाणूच्या संकटामुळे पहिल्या टप्प्यात 10 ऐवजी 5 विमाने देणेच शक्य असल्याचे स्पष्ट केले होते. 

(edited by-kartik pujari)
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arvinder Singh Lovely : दिल्ली काँग्रेसचे अध्यक्षपद सोडणारे अरविंदर सिंह लवली अखेर भाजपमध्ये दाखल

Latest Marathi News Live Update: राहुल गांधींना 'शेहजादा' म्हणणाऱ्या पंतप्रधान मोदींवर प्रियंका गांधींचा हल्लाबोल

Best Saving Plan : दिवसाला फक्त २५० रुपये सेव्हिंग करा अन् २४ लाख रुपये मिळवा; लखपती बनवणारी सरकारी स्कीम

MI vs KKR IPL 2024 : IPL मधून मुंबई इंडियन्सचा पत्ता कट होणे टीम इंडियासाठी ठरणार गोड बातमी? जाणून घ्या कारण

Pension Department: पेन्शनधारकांना मोदी सरकारची मोठी भेट! नवीन ऑनलाइन पोर्टल केले लाँच; मिळणार 'या' सुविधा

SCROLL FOR NEXT