Mount Kailas Journey  esakal
देश

Mount Kailas Journey : आता भारतातून थेट होणार कैलास पर्वताचे दर्शन, चीनमध्ये जाण्याची गरजच नाही

भोलेनाथांचे निवासस्थान मानल्या जाणार्‍या कैलास पर्वताचे दर्शन भारतातूनच भाविकांना करता येणार आहे.

साक्षी राऊत

Mount Kailas Journey : शिवभक्तांसाठी एक आनंदाची बातमी असून त्यांचा कैलास पर्वताचा प्रवास आता आणखी सुकर होणार आहे. भोलनाथांचे दर्शन घेण्यासाठी आता त्यांना चीनमध्ये जाण्याची गरज भासणार नाही. या वर्षी सप्टेंबरपासून, भोलेनाथांचे निवासस्थान मानल्या जाणार्‍या कैलास पर्वताचे दर्शन भारतातूनच भाविकांना करता येणार आहे.

संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले की, बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन (BRO) ने पिथौरागढ जिल्ह्यातील नाभीढांग येथील KMVN हट्सपासून भारत-चीन सीमेवरील लिपुलेख खिंडीपर्यंत रस्ता साफ करण्याचे काम सुरू केले आहे, जे सप्टेंबरपर्यंत पूर्ण होईल.

बीआरओच्या डायमंड प्रोजेक्टचे मुख्य अभियंता विमल गोस्वामी म्हणाले, “आम्ही नाभीढांगमधील केएमव्हीएन हट्सपासून लिपुलेख खिंडीपर्यंतचा सुमारे साडेसहा किलोमीटरचा रस्ता कापण्याचे काम सुरू केले आहे. रस्त्याचे काम पूर्ण झाल्यानंतर रस्त्याच्या कडेला 'कैलास व्ह्यू पॉइंट' तयार होईल.

हीरक प्रकल्पाला भारत सरकारने 'कैलास व्ह्यू पॉइंट' विकसित करण्याची जबाबदारी दिली आहे. गोस्वामी म्हणाले की, रोड कटिंगचे बरेच काम झाले असून हवामान अनुकूल असल्यास सप्टेंबरपर्यंत ते पूर्ण केले जाईल. (Lord Shiva)

लिपुलेख खिंडीतून होणारी कैलास-मानसरोवर यात्रा कोरोना महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली होती. जी अजून सुरू झालेले नाही.

आधी भोलभक्तांना भोलेनाथांचे दर्शन करण्यासाठी चिनमधून जावे लागायचे. मात्र सप्टेंबरपर्यंत रस्त्याचे काम पूर्ण झाल्यास भारतातूनच थेट भोलेनाथांचे दर्शन घेणे भक्तांना शक्य होईल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ohh Shit...! अभिषेक आजारी, त्यात स्टार फलंदाज झाला जखमी; जसप्रीतच्या यॉर्करवर डावी टाच दुखावली, वेदनेने कळवळला...

8th Pay Commission: आठव्या वेतन आयोगाबाबत अपडेट! केंद्र सरकारने राज्यसभेत दिलं लेखी उत्तर; उद्या सरकारी कर्मचाऱ्यांचा संप

Vande Bharat Cyclothon : वंदे मातरम' कोस्टल सायक्लोथॉन सायकल रॅलीतून सागरी सुरक्षेचा संदेश

T20 World Cup AUS vs IRE : संकटांवर मात करत ऑस्ट्रेलियाने पहिला सामना जिंकला; आयर्लंडने स्पर्धेतून जवळपास गाशा गुंडाळला

Latest Marathi News Live Update : बांधकाम नकाशा हीच अकृषिक परवानगी - जमीन महसूल कायद्यात सुधारणा

SCROLL FOR NEXT