Mamata Banerjee
Mamata Banerjee esakal
देश

पश्चिम बंगालमध्ये 'नियोजन आयोग' स्थापणार; ममतांची घोषणा

Amit Ujagare (अमित उजागरे)

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये (West Bengal) नियोजन आयोगाची (Planning Commission) स्थापना करण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी केली आहे. मोदी सरकारनं नियोजन आयोग बरखास्त करुन नीती आयोगाची स्थापना केली असली तरी आम्ही तो बंगालमध्ये स्थापण्याची तयारी सुरु केली असल्यांचही त्यांनी म्हटलं आहे. नेताजी सुभाषचंद्र बोस (Netaji Subhash Chandra Bose) यांच्या १२५ व्या जयंती निमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केली. (We are bringing Planning Commission in Bengal says West Bengal CM Mamata Banerjee)

या कार्यक्रमात ममतांनी भाजपवर चौफेर टीका केली. त्या म्हणाल्या, "तुम्हाला पश्चिम बंगालची अॅलर्जी का आहे? आधी २६ जानेवारीच्या आमच्या चित्ररथाला परवानगी नाकारली. आता नेताजींचा पुतळा बसवण्याचा निर्णय फक्त आमच्या दबावामुळे घेण्यात आला. पण, पुतळा बसवला म्हणून जबाबदारी संपत नाही"

आजपर्यंत तुम्हाला नेताजींचा ठावठिकाणी माहिती नाही. आम्ही सत्तेवर आल्यावर ते काम करू असं केंद्र सरकारने सांगितलं होतं. पण, प्रत्यक्षात तसं काहीही घडलं नाही. खरंतर पश्चिम बंगाल सरकारने सुभाषचंद्र बोस यांच्यावरील सर्व फायली उघड केल्या आहेत. बंगाल नसता तर देशाला स्वातंत्र्य मिळाले नसते. मला बंगाली असण्याचा अभिमान वाटतो, असंही ममता यावेळी म्हणाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Constitution : '...तर मोदी सरकारने केव्हाच देशाचे संविधान बदलले असते'

Pratik Gandhi : प्रतीक साकारतोय गांधी ; हॅरी पॉटर फेम 'या' अभिनेत्याची सिनेमात वर्णी

Reels Addiction : इन्स्टाग्राम अन् यूट्यूबचं कशामुळे लागतंय व्यसन? जाणून घ्या कसं काम करतं अल्गोरिदम..

Rishabh Pant: "ऋषभ पंतसोबत लग्न कर, तो तुला खुश ठेवेल..."; नेटकऱ्याची कमेंट, उर्वशीनं अवघ्या दोन शब्दात दिलं उत्तर

'संजय राऊत माझा छळ करत आहेत'; निलम गोऱ्हेंनी वाचून दाखवलं स्वप्ना पाटकरांचं निवेदन

SCROLL FOR NEXT