facebook 
देश

पक्षपातीपणाच्या आरोपावर फेसबुक म्हणाले, आम्ही निष्पक्ष!  

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : आम्ही निष्पक्ष असून धर्म, जात, लिंग, राजकीय पक्ष अशा आधारावर पक्षपातीपणा करत नाही. असा खुलासा फेसबुकने पत्र पाठवून केला आहे. वॉल स्ट्रीट जर्नलने फेसबुक आणि भाजप यांच्यातील हितसंबंधावर भाष्य करणारा रिपोर्ट प्रकाशित केल्यानंतर फेसबुकच्या निष्पक्षपातीपणावरुन आरोप-प्रत्यारोप सुरु झाले होते. त्याबाबतचे खुलासे अजुनही सुरु आहेत. फेसबुक हे भारतीय लोकशाहीत अवाजवी हस्तक्षेप करत असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते के. सी. वेणुगोपाल यांनी केला होता. त्यांनी लिहलेल्या दोन पत्रांनंतर त्याला उत्तर म्हणून फेसबुकचे धोरण संचालक नील पॉट्स यांनी हा खुलासा केला आहे. 

फेसबुकने आपले धोरण बदललेले नाही. सार्वजनिक क्षेत्रात वावरणाऱ्या व्यक्तीने द्वेष पसरविणारे वक्तव्य केलं तर आम्ही ते काढून टाकतो. कंपनी निष्पक्ष आहे. लोकांना मोकळेपणाने इथे व्यक्त होता यावं, याची काळजी आम्ही घेतो आणि त्यासाठी सतत प्रयत्न करतो. आमच्यावर केले गेलेले आरोप आम्ही गांभिऱ्याने घेत असून आम्ही सर्वप्रकारच्या द्वेषाचा आणि धर्मांध वृत्तीचा निषेध करतो. आमच्या धोरणानुसार याप्रकारे द्वेष पसवणारे भाष्य करणाऱ्या पोस्ट आम्ही काढून टाकल्या असून इथून पुढेही काढून टाकू, असे त्या पत्रात नमुद केले आहे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

फेसबुक इंडियाच्या संचालक आंखी दास यांच्या भुमिकेवरही प्रश्नचिन्ह उठवले गेले होते. भाजप फेसबुकला सर्वाधिक जाहिराती देते त्यामुळे आर्थिक हितसंबंधातून हा पक्षपातीपणा केला जात असून याची चौकशी केली जावी, अशी मागणी केली जात होती. मात्र या पत्रात आंखी दास चौकशीबाबत मौन बाळगले आहे. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दरम्यान केंद्रीय माहिती व तंत्रज्ञानमंत्री रविशंकर प्रसाद यांनीही भाजपकडून पत्र पाठवून उजव्या विचार मांडणाऱ्या व्यक्तींच्या मजकुराबाबत फेसबुककडून पक्षपातीपणा केला जात असल्याचा आरोप केला होता. कालच भाजपचे आमदार असणाऱ्या टी राजा सिंग यांचे फेसबुक अकाउंट द्वेष पसरवणाऱ्या पोस्टमुळे बंद करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Ganeshotsav Traffic Rules: गणेशोत्सवात पुणे मध्यवर्ती भागातील हलक्या मालवाहू वाहनांना पहाटे २ ते सकाळी ११ पर्यंतच लोडिंग-अनलोडिंगची मुभा

Education Alert: शिक्षकांच्या आंदोलनामुळे शाळा बंद राहू नयेत; आरोग्य, बाल विकास, ग्रामपंचायत विभागाला सूचना

1980s AI Photo Trend: ChatGPT वरील एक फोटो पर्यावरणाला पडतोय महागात? व्हायरल AI फोटो 'ट्रेंड'मागचं धक्कादायक वास्तव

VARUN CHAKRAVARTHY: अफगाणिस्तानविरुद्ध भारताच्या विजयाला मोठं ग्रहण! वरुण चक्रवर्ती मालिकेतून बाहेर; एशियन गेम्सही मुकण्याची शक्यता

Road Accident: पोळ रांजणगावजवळ भीषण अपघात; अज्ञात वाहनाच्या धडकेत लासूरगावच्या २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू

SCROLL FOR NEXT