देश

आम्हाला जनावरांचा डॉक्‍टर नको; युवक काँग्रेसच्या अध्यक्षांची विनंती

सकाळ न्यूज नेटवर्क

नवी दिल्ली : "काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेणार नाही, आता दुसरा नेता निवडा,' असे बजावणाऱ्या राहुल गांधींना "रुग्णशय्येवर असलेल्या कॉंग्रेसला ऍलोपॅथी डॉक्‍टरची गरज असताना जनावरांचा डॉक्‍टर का देता?' अशी विचारणा आजच्या कॉंग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीत करण्यात आल्याचे कळते. 

लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर 25 मे रोजी झालेल्या कार्यकारिणी बैठकीत राहुल गांधी संतप्त आणि अन्य नेते स्तब्ध होते. त्या तुलनेत आजच्या बैठकीत अन्य नेते राहुल गांधी यांचा राजीनामा नाकारण्यासाठी आक्रमक आणि स्वतः राहुल इतरांचे ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत, अशी परिस्थिती होती.

कार्यकारिणीतील सूत्रांच्या माहितीनुसार, बैठकीच्या सुरवातीलाच उपस्थित नेत्यांनी राहुल यांचा राजीनामा स्वीकारला जाणार नाही, असा पवित्रा घेतला. सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधींसह अन्य ज्येष्ठ नेते बैठकीत सहभागी झाले होते. 

युवक कॉंग्रेसचे अध्यक्ष बी. व्ही. श्रीनिवास यांनी तर पक्षाला रुग्णाची उपमा देताना, पक्षाला बरे करण्यासाठी ऍलोपॅथी डॉक्‍टरची आवश्‍यकता असून तुम्ही व्हेटर्नरी (जनावरांचा) डॉक्‍टर का देत आहात, असे म्हटल्यामुळे जोरदार हशा पिकला. सोनिया, राहुल यांनाही हसू आवरले नाही. मात्र, राहुल गांधींनी राजीनामा मागे घेणार नसल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट केले. आपल्याला काही झाले असते तर पक्षाने नवा नेता निवडला नसता काय, असा प्रश्‍न राहुल यांनी करताच बैठकीत शांतता पसरली होती. 

अर्थात, या वेळी सोनिया गांधींनी केलेल्या सवालामुळे गेल्या काही दिवसांपासून अध्यक्षपदासाठी नाव चर्चेत आलेल्या जुन्या-नव्या नेत्यांची चांगलीच बोलती बंद झाली. राजीनामा मागे घेण्याचा राहुल यांना आग्रह सुरू होताच सोनिया गांधींनी "तुमच्यापैकी बरेच जण अध्यक्षपदासाठी इच्छुक आहेत,' असे म्हणताच चपापलेल्या या नेत्यांनी आपली इच्छा नाही असे म्हणत केलेली सारवासारवही उपस्थितांमध्ये चर्चेचा विषय ठरली होती.

अखेरीस सोनिया गांधी आणि राहुल गांधींनी, नव्या नेतृत्वाची निवड लोकशाही प्रक्रियेनुसार व्हावी यासाठी आपण बैठकीत सहभागी नसल्याचे जाहीर केले. बैठकीतून बाहेर पडताना सोनिया गांधींनी पत्रकारांशी बोलताना निवड प्रक्रियेपासून लांब राहण्याच्या कारणाचा खुलासा केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Fine: एसटी बस चुकीच्या ठिकाणी थांबवली तर कर्मचाऱ्यांच्या पगारातून दंड वसूल करणार! MSRTC चा मोठा निर्णय, काय कारवाई होणार?

Ravi Shastri:"विराट कोहली 'अहंकारी आणि बिघडलेला मुलगा'? रवी शास्त्रींनी केला मोठा खुलासा; म्हणाले, तो फक्त मैदानातच..."

१६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधानांनी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय सांगितलं?

Sachin Pilgaonkar: '...पण हे सर्व कालच घडल्यासारखे वाटते‘, त्या खास छायाचित्रामुळे सचिन पिळगावकर रमले जुन्या आठवणींमध्ये

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

SCROLL FOR NEXT