adar poonawal 
देश

कोरोना लशीचा 5 कोटीचा स्टॉक; आता केंद्र सरकारला ठरवायचंय- अदर पुनावाला

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- सीरम इंन्स्टिट्यूटचे मुख्य कार्यकारी अधिकारी अदर पुनावाला यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे कोरोना लशीसंबंधी महत्वाची माहिती दिली आहे.  'भारत कोवॅक्स'चा भाग आहे आम्ही जे काही उत्पादन घेऊन त्यातील 50 टक्के भारतीयांसाठी राखीव असेल, असं ते म्हणाले आहेत. भारतासारख्या मोठ्या लोकसंख्येच्या देशाला पहिल्या टप्प्यात आम्ही 5 कोटी लशीचे डोस देऊ शकू, असंही ते म्हणाले आहेत. 

आमच्याकडे सध्या 5 कोटी डोस स्टॉकमध्ये आहेत. काही दिवसामध्ये आम्हाला नियामक मंडळाची मंजुरी मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर केंद्र सरकारला ठरवायचं आहे की किती लवकर आणि किती लशीचे डोस ते घेऊ शकतात. जूलै 2021 पर्यंत आम्ही जवळपास 30 कोटी कोरोना लशीचे डोस तयार करु, असं अदर पुनावाला म्हणाले आहेत. 

2021 च्या पहिल्या सहा महिन्यात कोरोना लशीची कमतरचा जगभरात भासणार आहे, पण त्याला काही पर्याय नाही. 2021 च्या ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यापासून लस मोठ्या प्रमाणात तयार होऊ लागतील. त्यामुळे पुरवढाही सर्वांना होऊ लागेल, असं ते म्हणाले. 

दरम्यान, भारतात कोरोना लस निर्मितीमध्ये सीरम इंन्स्टिट्यूट आघाडीवर आहे. सीरम इंन्स्टिट्यूटने ऑक्सफर्ड-अॅस्ट्राझेनकासोबत करार केला असून त्यांच्यामार्फत कोविशिल्ड लस तयार केली जात आहे. काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुण्यातील सीरम इंन्स्टिट्यूटला भेट दिली होती. काही दिवसांमध्ये भारतीय जनतेला कोविशिल्ड लस मिळण्याची शक्यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dog Bite : पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; आळे परिसरातील बारा जणांचा घेतला चावा; नऊ जण गंभीर

Italian Style Aloo Paratha: आलू पराठ्याला द्या 'हा' इटालियन ट्विस्ट! चव अशी की रोज हाच पराठा मागाल

आजचे राशिभविष्य - 12 सप्टेंबर 2026

Bidkin News : रस्त्याच्या कामावरून वाद; लोखंडी रॉडने मारहाण करणारे तिघे अहिल्यानगर हद्दीजवळून ताब्यात...

Pune News : राज्यातील ऑनलाइन कामकाज ठप्प; कृषी कर्मचाऱ्यांनी लॅपटॉप जमा केले, आंदोलन तीव्र

SCROLL FOR NEXT