amit shaha program in pune  sakal
देश

केंद्राचे काही निर्णय चुकले असतील, मात्र हेतू चांगलाच

जनतेचा देशाच्या लोकशाहीवर विश्वास वाढला हे नरेंद्र मोदी सरकारचे सर्वात मोठे यश आहे.

निनाद कुलकर्णी

नवी दिल्ली : मोदी सरकारचे काही निर्णय चुकीचे असू शकतात, मात्र सरकारचा हेतू नेहमीच स्पष्ट होता, असे मत गृहमंत्री अमित शहा ( Home Minister Amit Shah) यांनी व्यक्त केले आहे. फेडरेशन ऑफ इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स (FICCI) च्या 94 व्या वार्षिक परिषदेत ते बोलत होते. 130 कोटी जनतेचा देशाच्या लोकशाहीवर विश्वास वाढला हे नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारचे सर्वात मोठे यश आहे, असेही शाह यावेळी म्हणाले. देशाच्या विकासात फिक्कीच्या योगदानाचीही त्यांनी प्रशंसा केली.

अमित शहा म्हणाले, 'सरकारचे काही निर्णय कदाचित चुकीचे असतील. पण हेतू चुकीचा नव्हता असे सागंत, ते म्हणाले की, सरकारवर भ्रष्टाचाराचा (Corruption) एकही आरोप नाही. सर्व संबंधितांशी सल्लामसलत केल्यानंतर सर्वच क्षेत्रात सुधारणा (Development) करण्यात आल्या आहेत. कोरोना (Corona) काळात सरकारने असे अनेक निर्णय घेतले आहेत, ज्याचा लोकांना दीर्घकाळ फायदा होईल.

अडीच वर्षांपासून 80 कोटी लोकांना प्रति व्यक्ती 5 किलो धान्य देण्याचे काम भाजपच्या नरेंद्र मोदी (Narendra Modi) सरकारने केले असून, भारतीय अर्थव्यवस्था (India Economy) वेगाने सुधारत असल्याचे ते म्हणाले. चालू आर्थिक वर्षात भारताची अर्थव्यवस्था वेगाने वाढत असून, देशाचा आर्थिक दर दुहेरी अंकात येईल यात आश्चर्य वाटणार नसल्याचेही शहा यांनी यावेळी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT