Eknath Shindes Target now Dhanushya Baan Letter to Election Commission  
देश

'धनुष्यबाण' आम्हालाच मिळावं; CM शिंदेंचं निवडणूक आयोगाला साकडं!

निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंना 'या' तारखेपर्यंत दिली मुदत

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली : शिवसेनेत फूट पडल्यानंतर आता पक्ष चिन्ह असलेल्या धनुष्यबाणावरुन दोन्ही गटांमध्ये लढाई सुरु झाली आहे. येत्या काळात अंधेरी ईस्ट विधानसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण हे चिन्ह आपल्याच गटाला मिळावं अशी मागणी शिंदे गटानं केली आहे. (We should get ShivSena bow and arrow CM Eknath Shinde write letter to Election Commission)

निवडणूक आयोगात आज शिवसेनेच्या पक्षचिन्हाबाबत सुनावणी पार पडली. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनुष्यबाण चिन्ह आपल्यालाच मिळावं असा मागणी अर्ज निवडणूक आयोगाकडं सादर केला. येत्या काळात अंधेरी ईस्ट विधानसभा मतदारसंघाची निवडणूक पार पडणार आहे. यापार्श्वभूमीवर हे चिन्ह आपल्यालाच मिळावं असंही त्यांनी अर्जामध्ये म्हटलं आहे.

दरम्यान, शिंदेंचं बंड म्हणजे स्वेच्छेनं पक्ष सोडल्याची कृती. त्यामुळं त्यांच्या गटातील आमदारांकडे पक्षाचं प्राथमिक सदस्यत्व राहिलं नसल्यानं त्यांना पक्ष चिन्ह मिळवण्याचा अधिकार नाही, अशी बाजू उद्धव ठाकरे गटानं मांडली आहे.

तर निवडणूक आयोगानं उद्धव ठाकरेंनाही अर्ज सादर करण्याची मुदत दिली आहे. त्यानुसार, ८ ऑक्टोबर रोजी दुपारी २ वाजेपर्यंत ठाकरेंना आपलं म्हणणं आणि कादगपत्र आयोगाकडं सादर करावी लागणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Harshvardhan Sadgir Retire: महाराष्ट्र केसरीचा किताब जिंकताच हर्षवर्धनची निवृत्तीची घोषणा; सरकारला ठरवलं जबाबदार

Ashok Kharat: पोलिसांनी अशोक खरातचा माज उतरवला! अखेर रडत रडत 'नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला' असल्याचा म्हणाला, पाहा व्हिडिओ

Maharashtra Kesari Prize: विजेता हर्षवर्धन सदगीरसह उपविजेता महेंद्र गायकवाडही मालामाल; पाहा कोणाला काय मिळालं बक्षीस

Rohit Pawar: महाराष्ट्र महिला आयोगाची कमान कोणाकडे? रोहित पवारांनी ४ नावे सुचवली; महायुतीची डोकेदुखी वाढवली!

Maharashtra Kesari: नाशिकचा हर्षवर्धन सदगीर 'डबल महाराष्ट्र केसरी'! महेंद्र गायकवाडला चितपट करत पटकावली मानाची गदा

SCROLL FOR NEXT