Arvind Kejriwal
Arvind Kejriwal file photo
देश

दिल्ली होणार अनलॉक; CM केजरीवाल यांची घोषणा

वृत्तसंस्था

आम्ही दर आठवड्याला दिल्लीतील नागरिकांच्या सूचना तसेच तज्ज्ञांच्या मतांनुसार अनलॉकची प्रक्रिया सुरू ठेवणार आहेत. जर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली तर लॉकडाउन पुन्हा लागू करण्यात येईल.

नवी दिल्ली : कोरोनामुळे हैराण झालेल्या दिल्लीकरांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमधील कोरोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याने लॉकडाउन हटविण्याचा निर्णय घेण्याचा विचार दिल्ली सरकार करत आहे. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी (ता.२८) दिल्लीत अनलॉकच्या प्रक्रियेला सुरवात करण्याची घोषणा केली. खूप प्रयत्नांनंतर कोरोनाला आळा घालण्यात यश मिळाले आहे, पण अजूनही कोरोनाविरुद्धचे युद्ध संपलेले नाही. (We will begin the unlocking process says Delhi CM Arvind Kejriwal)

केजरीवाल पुढे म्हणाले, 'दिल्लीतील लॉकडाउन हळूहळू उठविण्यात येणार आहे. सर्वात आधी बांधकाम आणि कारखाने सुरू करण्यास परवानगी दिली जाईल. अनेक कामगार, गरीब लोक या क्षेत्रावर अवलंबून आहेत. पुढील एक आठवड्यासाठी ही दोन्ही क्षेत्रे खुली राहतील.'

तर दिल्लीत पुन्हा लॉकडाउन

आम्ही दर आठवड्याला दिल्लीतील नागरिकांच्या सूचना तसेच तज्ज्ञांच्या मतांनुसार अनलॉकची प्रक्रिया सुरू ठेवणार आहेत. जर कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढू लागली तर लॉकडाउन पुन्हा लागू करण्यात येईल. त्यामुळे कोरोना प्रतिबंधक तसेच सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन मुख्यमंत्री केजरीवाल यांनी केलं आहे.

लोकांना मदतीची गरज आहे. दिल्लीकरांनी नियमांचे पालन केले तर अर्थचक्र सुरू होईल. नियमांकडे दुर्लक्ष केल्याने पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागल्यास लॉकडाउनचा निर्णय घेण्यात येईल. वारंवार लॉकडाउन करणे हे आम्हालाही पटत नाही, पण त्याशिवाय दुसरा कोणताही पर्याय नाही. गरज नसेल तर विनाकारण घराबाहेर पडू नका. काळ खूप कठीण आहे. कोरोनाच्या नियमांचे सर्वांनाच खूप गंभीरतेने पालन करावं लागणार आहे. तरच आपण दिल्लीला वाचवू शकतो.

देशभरातील आणखी बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Water Scarcity : पिण्याच्या पाण्यासाठी दाहीदिशा वणवण ; राज्यात भीषण टंचाई,७४९५ वस्त्यांवर टँकरद्वारे पुरवठा

Daily Rashi Bhavishya : आजचे राशिभविष्य - 30 एप्रिल 2024

Narendra Modi in Pune : रेसकोर्सवर अवतरला ‘केसरिया सागर’

Nashik Ashok Kataria Fraud Case: अशोक कटारिया यांचा ‘अटकपूर्व’ फेटाळला! अडचणीत वाढ; हायकोर्टात जाण्याची शक्यता

IPL 2024, KKR vs DC: कोलकातानं मागच्या सामन्यातून धडा घेतला अन् पंतच्या दिल्लीला चारीमुंड्या चीत केलं

SCROLL FOR NEXT