CJI DY Chandrachud Sakal
देश

DY Chandrachud : एका दिवसात ३२३ खटले संपवायचे, मगच जेवायचं; चंद्रचूड यांचा निर्धार

प्रत्येक खटला आपण स्वतः पाहणार असल्याचंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे.

वैष्णवी कारंजकर

भारताचे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड सध्या सत्तासंघर्षाच्या किचकट खटल्यात दिलेल्या निकालामुळे चर्चेत आहेत. राज्यातल्या सत्तासंघर्षाच्या निकालानंतर काही जणांनी त्यांचं कौतुक केलं, तर काही जणांनी या निर्णयाबद्दल त्यांच्यावर टीका केली आहे. चंद्रचूड आता पुन्हा एकदा कौतुकाचा विषय ठरत आहेत, याचं कारण म्हणजे त्यांच्या कामाचा वेग.

सध्या सर्वोच्च न्यायालयामध्ये त्यांनी कामाचा धडाका लावला आहे. आजच्या दिवसामध्ये एकूण ३२३ सुनावण्या होणार आहेत. या सगळ्या सुनावण्या संपल्या की मगच जेवायला जायचं, असे आदेशच चंद्रचूड यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोडले आहेत.

या आठवड्यामध्ये सर्वोच्च न्यायालयामध्ये एकूण १५०० खटले सादर होणार आहेत. मात्र हे पार पाडणे कोर्टाला अशक्य नाही, त्यामुळे मी स्वतः प्रत्येक खटला पाहीन, असंही चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या भूमिकेनंतर त्यांचं सोशल मीडियावर चांगलंच कौतुक होताना दिसत आहे.

दहा मिनिटं उशीर झाल्याने मागितली होती माफी

यापूर्वीही सरन्यायाधीश चंद्रचूड कौतुकाचा विषय ठरले होते. एके दिवशी चंद्रचूड यांना कोर्टात पोहोचायला फक्त १० मिनिटे उशीर झाला. तरीही त्यांनी कोर्टात उपस्थित असलेल्या सर्वांची जाहीरपणे माफी मागितली होती. नुकताच हा किस्सा त्यांच्या एका सहकाऱ्याने सांगितला. तेव्हाही चंद्रचूड यांच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला होता.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe: तुकाराम मुंढे होणार MPSCच्या चौकशी आयोगाचे नवे सचिव, शिवेंद्र राजेंची मोठी घोषणा

IND vs WI, 3rd T20I: अभिषेकच्या वादळानंतर अर्शदीपचा अचूक मारा अन् भारताचा वेस्ट इंडिजवर थरारक विजय; मालिकेतही आघाडी

सूर्यदेव तूळ राशीत प्रवेश करताच १२ राशींचं नशिब बदलणार? करिअर, पैसा अन् नात्यांवर कसा होणार परिणाम?

IND vs WI: तिलक वर्माचा ब्रेनफेड मुमेंट... चौकार झाला असं वाटलं अन् झाला विचित्रपद्धतीने रन आऊट; पाहा Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्रापासून दिल्लीपर्यंत आज दिवसभरात काय घडलं? एका क्लिकवर पहा सर्व महत्त्वाचे अपडेट्स

SCROLL FOR NEXT