Heat Wave sakal
देश

Heat Wave : तब्येत सांभाळा! यूपी-बिहार, झारखंडमध्ये उष्माघाताचा कहर; आतापर्यंत १०० जणांचा मृत्यू

रोहित कणसे

एकीकडे दिल्ली-एनसीआरमध्ये सकाळी पाऊस झाल्याने नागरिकांना उष्णतेपासून दिलासा मिळाला. यासोबतच वातावरणात गारवा देखील वाढला. यादरम्यान यूपी, बिहार, झारखंड आणि ओडिसासह अनेक राज्यांत प्रंचड उष्णाता आणि तापमान वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.

उत्तर प्रदेशातील बलिया जिल्ह्यात मागील चार दिवसात उष्णतेच्या लाटेमुळे आतापर्यंत ५७ लोकांचा मृत्यू झाला आहे.हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार अजून दोन ते तीन दिवस गरमी आणि उष्णतेची लाट कायम राहू शकते.

IMD ने दिलेल्या माहितीनुसार पुढील दोन ते तीन दिवस झारखंड, ओडिसा, छत्तीसगढ, विदर्भ, तेलंगनाच्या काही भागांमध्ये उष्णतेची लाट पाहायला मिळेल. यानंतर हवामानात थोडा बदल अपेक्षित आहे. तसेच मान्सून देखील पुढे सरकरण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाच्या ताज्या अपडेट्सनंतर पुढील दोन दिवसांत आंध्र प्रदेश, बिहार, झारखंड, गंगेच्या पश्चिमेचा बंगाल, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेशमध्ये हवामानात सुदारणा होईल आणि लोकांना उष्णतेच्या लाटेपासून दिलासा मिळेल.तसेच २० ते २२ जून पर्यंत बिहार, झारखंड, यूपी मध्ये मान्सून आणि मान्सून पूर्व पाऊस पडण्याची शक्यता आहे. यामुळे लोकांनी उष्णतेपासून सुटका मिळेल.

यादरम्यान बिहारमध्ये देखील प्रचंड उष्णतेची लाट पाहायला मिळत आहे. राज्यात वेगवेगळ्या जिल्ह्यात १७ लोकांचा उष्णतेमुळे जीव गेला आहे. रोहतास जिल्ह्यात मागील २४ तासांत उष्माघाताने आठ लोक दगावले आहेत. बिहारच्या शेजारचे राज्य झारखंड येथे वाढलेल्या उष्णतेमुळे आठवी पर्यंतच्या सर्व शाळा २१ जून पर्यंत बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. बिहारच्या अनेक जिल्ह्यात पारा ४४ डिग्रीच्या वर पोहचला आहे.

ओडिसामध्ये देखील पारा ४६ डिग्रीच्या वर पोहचला असून आतापर्यंत राज्यभरात २० लोकांचा मृत्यू झाला आहे. पुढील दोन -तीन दिवसात मान्सून ओडिसामध्ये दाखल होण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

अग्रलेख : शोध हरवलेल्या आवाजाचा!

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 5 जुलै 2025

Latest Maharashtra News Updates : विजयी मेळाव्यानिमित्त ठाकरे बंधू येणार एकाच व्यासपीठावर, शिवसेना-मनसेचा आज भव्य मेळावा

मन, मेंदू आणि आपण

हौस ऑफ बांबू : सहासष्ट आणि नव्याण्णव..!

SCROLL FOR NEXT