Weather Update Esakal
देश

Weather Update: गारठा वाढणार! राजधानी दिल्लीचा पारा घसरला; आणखी पाच दिवस धुके तर 'या' राज्यांमध्ये पावसाची शक्यता

Weather Update: उत्तर भारतात गारठा वाढला आहे. तर काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह जम्मू-काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे.

अंकिता खाणे (Ankita Khane)

नवी दिल्ली : उत्तर भारतात गारठा वाढला आहे. तर काही राज्यांमध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दिल्ली, उत्तर प्रदेश, हरियाणा, पंजाबसह जम्मू-काश्मीरमध्ये कडाक्याची थंडी जाणवत आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील 4 ते 5 दिवसांत उत्तर भारतात दाट धुके कायम राहण्याची शक्यता आहे.

उत्तर हिमालयात हिमवृष्टी होत असल्याने दिल्लीसह उत्तर भारतातील बहुतेक राज्यांमध्ये थंटीची लाट आली आहे. राजधानी दिल्लीत शुक्रवारी रात्री या हंगामातील सर्वात कमी ३.९ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. हिमाचल प्रदेशातील उना शहरात ०.२ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली आहे. या थंडीच्या लाटेमुळे दाट धुके व ढगाळ वातावरण राहणार आहे.

दिल्लीत दाट धुके

दिल्लीत शनिवारी सकाळी दाट धुके असल्याने ५० मीटर अंतरावरचे देखील दिसत नव्हते. आणखी काही दिवस दिल्लीत दाट धुके राहण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे. दाट धुक्यामुळे विमाने आणि रेल्वे वेळापत्रकावर परिणाम झाला आहे.

'या' भागांमध्ये पावसाची शक्यता

जम्मू आणि काश्मीर, लडाख, गिलगिट, बाल्टिस्तान, मुझफ्फराबाद आणि हिमाचल प्रदेशमध्ये आज (14 जानेवारी) पाऊस आणि बर्फवृष्टी होण्याची शक्यता आहे. दक्षिण भारतात तामिळनाडू, पुद्दुचेरी, कराईकल, केरळ, माहे, किनारी आंध्र प्रदेश, यानम, रायलसीमा आणि दक्षिण अंतर्गत कर्नाटकात उद्या (15 जानेवारी) ईशान्य मोसमी पाऊस थांबण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. आज तमिळनाडूमध्ये पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.

उत्तरेकडून ईशान्येकडे दाट धुके, अनेक रेल्वे विलंबाने

पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि बिहारवर धुक्याचा थर दिसत आहे. दाट धुक्याचा रेल्वे सेवेवरही परिणाम होत आहे. दिल्ली एनसीआरमध्ये दाट धुक्यामुळे गीताजयंती एक्सप्रेस, दरभंगा नवी दिल्ली स्पेशल, गोरखधाम एक्सप्रेस, भुवनेश्वर स्पेशल, केरळ एक्सप्रेस, मगध एक्सप्रेस, मालवा एक्सप्रेस आणि श्रमजीवी एक्सप्रेस काही तास उशिराने धावत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashadhi Wari: कोरडिये काष्ठी अंकुर फुटले, येणे येथे जाले विठोबाचे; संतश्रेष्ठ भानुदास महाराजांनी पांडुरंगास हंपीतून आणले पंढरपूरला

Pune News : माता न तू वैरीनी! ३.५ लाखांसाठी ४० दिवसांच्या चिमुकली विकले...पुण्यातील धक्कादायक प्रकार

Thackeray Brothers : ठाकरे बंधू एकत्र आले, पण; कोल्हापुरात शिवसेना -मनसेचे मनोमिलन हेच मोठे आव्हान

Ashadhi Ekadashi 2025 : ऑस्ट्रेलियातील साधकांकडून वारीची साधना, माउलींच्या पालखी सोहळ्यात पूर्ण केली पायी वाटचाल; दोघे करणार परतवारी

Gahininath Maharaj: महाराष्ट्राची दक्षिण काशी असलेल्या पंढरपुरात सरकारने संतपिट स्थापन करावे : गहिनीनाथ महाराज

SCROLL FOR NEXT