web designer commits suicide by video calling girlfriend at indore 
देश

तुझ्यावर खूप प्रेम करतोय आता तू पाहाच...

वृत्तसंस्था

इंदोर (मध्य प्रदेश): प्रियकराने प्रेयसीला व्हिडिओ कॉल करत तुझ्यावर खूप प्रेम करतोय, आता तू पाहाच... असे म्हणाला आणि गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

सरफराज असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे. शहरातील राम नगर परिसरामध्ये तो मित्रांसोबत राहात होता. एका कंपनीमध्ये तो वेब डिजायनर म्हणून काम करत होता. युवतीसोबत त्याचे आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. प्रेमप्रकरणातून त्याने आत्महत्या केल्याची माहिती पुढे आली आहे. घटनास्थळी आत्महत्येपूर्वी कोणतीही चिठ्ठी आढळून आलेली नाही. पोलिसांनी त्याचा मोबाईल जप्त केला असून, पुढील तपास करत आहेत.

सरफराजच्या मित्रांनी सांगितले की, सरफराज एका युवतीवर खूप प्रेम करत होता. दोघांचे आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांनी एक सारखे टॅटू काढले होते. परंतु, युवतीने टॅटू काढून टाकल्यामुळे तो नाराज झाला होता. मैत्रिणीवर असलेल्या प्रेमाबद्दल सतत बोलून दाखवत होता. नैराष्यात गेल्यानंतर त्याने मैत्रिणीला व्हिडिओ कॉल केला आणि प्रेमाबद्दल बोलून गळफास घेऊन आत्महत्या केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Madhuri Elephant Nandani : अखेर माधुरी हत्तीण दोन दिवसात कोल्हापुरात येणार! वनतारातून नांदणीकडे प्रस्थान; राजू शेट्टीनी सोशल मीडियावर दिली माहिती

India T20I Squad : हर्षित राणाला नवी दुखापत, अफगाणिस्तान मालिका अन् Asian Games ला मुकणार! विदर्भाच्या खेळाडूला टीम इंडियात संधी

मुंबई गोवा हायवेच्या उद्घाटनाला येणार नाही, लाज वाटते; गडकरींचे विधान, म्हणाले, आता वेगळा वर्ल्ड रेकॉर्ड करायचाय

Maratha Reservation: मनाेज जरांगेंना ज्योती मेटेंचा थेट सवाल; ‘१२ मागण्या मान्य झाल्या, मग मुंबईला जाण्याचा हट्ट कशासाठी?’

Marathi News Live Updates : जरांगेंच्या समर्थनार्थ मराठा तरुणांचा आक्रमक एल्गार, पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलन

SCROLL FOR NEXT