signature esakal
देश

सोशल मीडियावर व्हायरल झाली डॉक्टरांची अनोखी सही, कॉपी करणं अशक्य

सध्या व्हायरल झालेल्या अनोख्या सहीचा फोटो समोर आलंय.

सकाळ डिजिटल टीम

सध्या व्हायरल झालेल्या अनोख्या सहीचा फोटो समोर आलंय.

सध्या सोशल मीडियावर (Social Media) अनोख्या सहीचा फोटो व्हायरल होत आहे. हे पाहून लोक आश्चर्यचकित झाले असून कमेंट्समध्ये त्यांच्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत. डॉक्टरांची अनोखी सही सोशल मीडियावर व्हायरल (Viral)होत आहे. जे या सहीचे फोटो पाहून लोक म्हणाले- 'कॉपी करणं अशक्य'

जगात प्रत्येकाची सही (Signature) वेगळी असते. त्यासाठी लोक प्रयत्न करतात की, त्यांच्या सहीची कॉपी कुणीही करू नये. लहान मुलं शाळेत असल्यापासूनच आपली सही युनिक करण्यासाठी सराव करतात. त्यामुळेच शाळेच्या वहीची मागची पानं असंख्य सह्यांनी भरलेली असतात, पण सध्या व्हायरल झालेल्या अनोख्या सहीचा फोटो समोर आलंय. जे पाहिल्यानंतर अनेकजण आश्चर्च झालेले आहेत. ही आश्चर्यकारक सही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हायरल होत असलेला फोटो पाहून असं वाटतं की कुणीतरी मोर बनवला आहे, पण नीट निरखून पाहिलं तर त्याखाली सील-शिक्का दिसेल. ही स्वाक्षरी गुवाहाटी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या एका अधिकाऱ्याची असल्याचे सांगितले जात आहे. इतकंच नाही तर काही जण या सहीची खिल्ली उडवत मजेशीर मिम्सही बनवत आहेत.

या सहीचा फोटो भारतीय पोलीस सेवेतील अधिकारी रुपिन शर्मा यांनीही शेअर केला आहे. हे अनोखं चित्र पाहिल्यानंतर लोक कमेंटच्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया देत आहेत.

एका व्यक्तीने या फोटोवर प्रतिक्रिया दिली आणि लिहिले की, असे दिसते की अधिकारी त्यांचे पेन व्यवस्थित काम करत आहेत की नाही हे तपासत आहेत. आणखी एका युझरने लिहिले,'डॉक्टर साहेबांनी त्याचा एक्स-रेही काढला आहे.' या सहीवर तुमचे काय मत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT