Supriya Sule 
देश

महाराष्ट्र, पश्चिम बंगालच्या चित्ररथांना परवानगी नाकारणे हा अपमान : सुळे

वृत्तसंस्था

नवी दिल्ली : संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन राज्यांच्या चित्ररथांना यंदाच्या प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात परवानगी नाकारून जनतेचा अपमान केल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे.

संरक्षण मंत्रालयाने पश्चिम बंगालकडून चित्ररथासाठी करण्यात आलेला प्रस्ताव नाकारला आहे. तर, महाराष्ट्राच्या चित्ररथालाही परवानगी देण्यात आलेली नाही. राज्य आणि केंद्रशासित प्रदेश यांच्याकडून आलेल्या 56 चित्ररथांच्या प्रस्तावांपैकी 22 प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. भाजपला मोठा संघर्ष करावा लागत असलेल्या पश्चिम बंगालच्या आणि नुकतेच भाजपला सत्तेतून बाहेर राहावे लागलेल्या महाराष्ट्राच्या चित्ररथांनाच परवानगी नाकारण्यात आल्याने महाराष्ट्रातील नेत्यांकडून नाराजी दर्शविण्यात येत आहे.

सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत म्हटले आहे. की प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली. हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय. महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे. या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहिर निषेध करते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Marathi News : कल्ला होणार... CSK संजू, सर्फराज यांच्यासह ५ खेळाडूंना पदार्पणाची संधी देणार, आयपीएल गाजवणार

IDBI बँकेत १३०० पदांसाठी मोठी भरती; पदवीधर उमेदवारांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

वृद्ध, दिव्यांग कर्मचाऱ्यांचा त्रास कमी होणार, कार्यालयांत विशेष सुविधा मिळणार; पालिकेचा महत्त्वाचा निर्णय

MLA Randhir Savarkar: शेतकऱ्यांच्या पीक कर्ज फेडीची मुदत ३० जूनपर्यंत वाढवावी: आमदार रणधीर सावरकर, अन्याय दूर करा!

Sanju Samson 0.32s Video: संजू सॅमसनचा 'हा' Video का झालाय व्हायरल? लोकेश राहुलने हाक मारली, सुरुवातीला तो पुढे निघून गेला अन्...

SCROLL FOR NEXT