assembly election 
देश

West Bengal, Assam Election Updates - मतदानाला सुरुवात; PM मोदींसह मनमोहन सिंग यांचे मतदारांना आवाहन

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली - Assembly Election 2021 - देशातील पाच राज्यांच्या निवडणुका होत असून यातील पश्चिम बंगाल (West bengal assembly election 2021) आणि आसाम विधानसभा (Assam assembly election 2021) निडवणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळी सात वाजता मतदान सुरु झालं आहे. दोन्ही राज्यात जवळपास दीड कोटींहून अधिक मतदार आहेत. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात 30 मतदारसंघात मतदान होत आहे. यामध्ये पुरुलिया आणि झाडग्राम जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील मतदान होणार आहे. तर आसाममध्ये पहिल्या टप्प्यात 47 जागांसाठी मतदान होत आहे. राज्यात तीन टप्प्यात मतदान होणार आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांनीही मतदारांना मोठ्या प्रमाणात मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. 

Updates - 

आसाम - डिब्रूगढ इथं मतदान केंद्रावर फुग्यांची सजावट करण्यात आली आहे. मतदारांनी मतदानासाठी रांगा लावल्याचं चित्र अनेक मतदारसंघात दिसून येतंय.

पश्चिम बंगाल - मिदनापूर मतदारसंघात मतदाना सुरु झालं असून प्रशासनाकडून संवेदनशील मतदारसंघात कडक सुरक्षा व्यवस्था तैनात केली आहे.

पश्चिम बंगाल - मिदनापूर जिल्ह्यात 509 संवेदनशील केंद्र आहेत. त्याठिकाणी 169 कंपन्या तैनात करण्यात आल्या आहेत. 50 टक्क्यांहून अधिक बूथवर सीसीटीव्ही, व्हिडीओग्राफर असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांनी दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आसामा आणि पश्चिम बंगालच्या मतदारांना विक्रमी मतदान करण्याचं आवाहन केलं आहे. मोदी सध्या बांगलादेश दौऱ्यावर असून त्यांनी ट्विटरवरून हे आवाहन केलं. 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही आसामच्या मतदारांना मतदानाचं आवाहन केलं आहे. आसामला पुन्हा शांततेच्या आणि विकासाच्या मार्गावर आणण्यासाठी मतदान करायलाच हवं असं डॉक्टर मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Multibagger Stock: 5 दिवसांतच 1 लाखाचे झाले 3 लाख! 300% रिटर्न देणाऱ्या शेअरने गुंतवणूकदारांना केले मालामाल

आरक्षणावरून सुरू झाला वाद अन् कॉलेजमध्ये पेटलं वातावरण! कसा आहे ‘जयंती २’? वाचा Review

Hindi Medium Engineering: इंग्रजीची अडचण दूर! आता चक्क हिंदीतून सिव्हिल इंजिनिअरिंग; विद्यार्थ्यांना मिळणार रु. २ लाखांचे अनुदान

Latest Marathi News Live Update : राज्यात दुष्काळजन्य स्थिती, राज्यात ऑगस्ट महिन्यात ४६ टक्के तूट

Ganeshotsav 2026: हरतालिका अन् गणेश चतुर्थी एकाच दिवशी का? पूजा करण्याची योग्य वेळ कोणती? | Ganesh Chaturthi 2026

SCROLL FOR NEXT