ASHOK DINDA
ASHOK DINDA 
देश

West Bengal: माजी क्रिकेटपटू आणि भाजप उमेदवार अशोक डिंडावर हल्ला 

सकाळन्यूजनेटवर्क

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये मोठी सुरक्षा व्यवस्था आणि केंद्रीय दलांच्या तैनातीनंतरही राजकीय हिंसा कमी होताना दिसत नाहीये. मंगळवारी माजी क्रिकेटपटू आणि मोयना विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढणारे भाजप उमेदवार अशोक डिंडा याच्यावर अज्ञातांनी हल्ला केला आहे. पूर्व मिदनापूरच्या मोयनामध्ये त्यांच्या कारवर काठ्या आणि दगडांनी हल्ला करण्यात आलाय. डिंडा थोडक्यात वाचल्याचं सांगितलं जातंय. पण, त्याच्या गाडीचे मोठे नुकसान झाले आहे. एक दिवसापूर्वीच भाजप उमेदवार सुवेंदु अधिकारी यांच्या ताफ्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता. टीएमसीचा झेंडा हातात घेतलेल्या लोकांनी त्यांच्या ताफ्यावर हल्ला केल्याचा आरोप करण्यात आलाय. पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडलंय. 1 एप्रिलला दुसऱ्या टप्प्यातील मदतान होईल. पण, त्याआधीच राज्यात मोठ्या प्रमाणात हिंसा होताना दिसत आहे. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hemant Savara: पालघरचा तिढा अखेर सुटला! हेमंत सावरांना महायुतीकडून उमेदवारी जाहीर

Udayanraje Bhosale : साताऱ्यातून उमेदवारी जाहीर करायला भाजपला इतका वेळ का लागला? उदयनराजे भोसलेंनी स्पष्टच सांगितलं; पाहा Exclusive Interview

Rohit Sharma Rinku Singh : पत्रकार परिषदेनंतर रोहित रिंकूला भेटला; केकेआरनं केलं ट्विट

SRH vs RR Live IPL 2024 : दोन धक्क्यानंतर यशस्वी, रियाननं डाव सावरला; राजस्थान 10 षटकात शतक पार

Akola News : अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही; व्हीडिओ व्हायरल, बार्शिटाकळीत गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT