humayun-kabir-and-bharati-ghosh 
देश

दोन पोलिस अधिकारी डेब्रात विधानसभा मतदारसंघात आमनेसामने

श्‍यामल रॉय

कोलकता - येथून शंभर किलोमीटर अंतरावर असलेल्या डेब्रा या पश्चिम मिदनापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदारसंघात दोन माजी पोलिस अधिकारी आमनेसामने आले आहेत. एकेकाळी ममता बॅनर्जी यांच्या समर्थक असलेल्या भारती घोष यांना भाजपने उमेदवारी दिली आहे. तृणमूल काँग्रेसची मदार हुमायूं कबीर यांच्यावर असेल.

हे दोघे पूर्वी एकमेकांचे सहकारी होते. भारती या पश्चिम मिदनापूरच्या माजी पोलिस अधिक्षक आहेत. ममता बॅनर्जी या जंगलमहलच्या माता आहेत असे पूर्वी त्या म्हणाल्या होत्या. माओवाद्यांनी लक्ष्य केलेल्या जंगलमहलच्या विकासासाठी ममतांनी अनेक विकास योजना राबविल्याचे त्या सांगत असत. आता नोकरीचा राजीनामा दिला आहे. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पदक परत केले
भारती यांना ममता यांच्याहस्ते पोलिस पदक प्रदान करण्यात आले होते. भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांनी ते पदक परत केले. तृणमूलच्या सूत्रांनुसार पक्षाच्या जिल्हा शाखेच्या कामकाजावर लक्ष ठेवून त्यांनी ममता यांनी अहवाल पाठविले. त्यांचा शब्द प्रमाण मानला जातो.

हार्वर्ड विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये शिकलेल्या भारती यांनी यूएनमध्येही (संयुक्त राष्ट्रे) काम केले आहे. प्रारंभी त्या सीआयडीमध्ये होत्या. पोलिस अधिक्षकपदी असताना भारती यांची तृणमूल सोडलेल्या मुकुल रॉय यांच्याशी जवळीक वाढल्याचा आरोप झाला. त्यामुळे ममता यांनी भारती यांना हटविले. २०१७ मध्ये नोकरीचा राजीनामा दिल्यानंतर दोन वर्षांनी त्या भाजपमध्ये दाखल झाल्या. २०१९च्या लोकसभा निवडणुकीत घाटालमध्ये त्यांचा तृणमूलचे उमेदवार देव अधिकारी यांच्याविरुद्ध पराभव झाला.

तृणमूलमध्ये असताना भारती यांच्यावर भाजप नेते आरोप करायचे. याच भारती यांची मोटार गेल्या वर्षी पोलिसांनी मोटार रोखून एक कोटी १३ लाख रुपयांची रोकड जप्त केली होती.

कबीरही वादग्रस्त
कबीर हे आधी हुगळी जिल्ह्यातील चंदेरनगरचे पोलिस आयुक्त होते. चंदेरनगर ही एकेकाळची फ्रेंच वसाहत आहे, जी अलीकडेच प्रकाशझोतात आली. सुवेंदू अधिकारी यांच्या येथील सभेदरम्यान गोली मारो अशा घोषणा दिलेल्या भाजपच्या आठ कार्यकर्त्यांना त्यांनी अटक केली होती. ममता यांची मर्जी संपादन करण्याचाच त्यांचा हेतू असल्याचा आरोप भाजपने केला आहे. कबीर येत्या एप्रिल महिन्यात सेवानिवृत्त होणार होते, पण त्यांनी गेल्या वर्षी निवृत्ती घेतली. त्यांची पत्नी आनंदिता या आधीपासूनच तृणमूलच्या कार्यकर्त्या आहेत. कबीर यांचे आई-वडील देब्राचे रहिवासी आहेत. ही बाब त्यांच्या पथ्यावर पडू शकते.

दोघांना विजयाचा आत्मविश्वास
भारती घोष आणि हुमायूं कबीर या दोन्ही उमेदवारांनी स्थानिक मंदिरांना भेटी दिल्या आहेत, तसेच रोड शो आयोजित केले आहेत. दोघांनाही विजयाचा आत्मविश्वास वाटतो. आपल्यासमोर प्रतिस्पर्धीच नसल्याचे भारती म्हणतात, तर कबीर यांनी म्हटले आहे की प्रत्येक उमेदवार आपला प्रतिस्पर्धी असला तरी त्यांची झुंज दुसऱ्या, तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकासाठी सुरु आहे.

Edited By - Prashant Patil

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT