Amit Shah 
देश

दीदी सत्तेत आहेत तोपर्यंत मलेरिया-डेंग्यू संपणार नाही; अमित शहांचा ममतांवर निशाणा

सकाळ डिजिटल टीम

West Bengal Assembly Election 2021 : पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीच्या प्रचारानं चांगलाच वेग घेतला आहे. प्रचार सभांदरम्यान दररोज खळबळजनक आणि वादग्रस्त वक्तव्ये केली जात आहेत. त्यातच आज केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी झारग्राम येथे प्रचारादरम्यान ममता दीदींना टार्गेट केलं. ते म्हणाले, जोपर्यंत दीदी सत्तेत आहेत तोपर्यंत मलेरिया-डेंग्यू संपणार नाही. दीदींची मलेरिया आणि डेंग्यूशी मैत्री आहे. तुम्ही दीदींना हटवा त्यानंतर कमळाच्या फुलाचं सरकार अर्थात भाजप दीड वर्षात मलेरिया संपवून टाकेल. 

शहा म्हणाले, "दीदी तुम्ही आम्हाला काय घाबरवत आहात. 'खेला होबे'नं आम्ही घाबरुन जाऊ असं तुम्हाला वाटतंय का? दीदींना माहिती आहे, बंगालमधील छोटं मुलंही फुटबॉल खेळतं, आपल्या 'खेला होबे'ला कोणीही घाबरत नाही." 

झारग्राम हिरवीगार जंगलं आणि लाल मातीची भूमी आहे. आदिवासी बांधवांनी अनेक वर्षांपासून या भूमीची संस्कृती टिकवून ठेवली आहे. माती आणि भूमिपुत्रांची घोषणा देत दीदी सत्तेत आल्या मात्र त्यांनी तुमच्यासाठी काहीही केलं नाही. आपण जंगलातून वनसंपत्ती गोळा करुन आणता त्याचा तुम्हाला चांगला मोबदला मिळत नाही. त्यामुळे आम्ही हे निश्चित केलंय की, आम्ही ४९ वन संपत्तींना किमान आधारभूत किंमत देऊन चांगला मोबदला मिळवून देण्यास सुरुवात करु, असंही यावेळी शहा म्हणाले.  

ऑनलाईन दाखले, मुलांचा शिक्षणाचा खर्च आणि पाच रुपयांत जेवण

पश्चिम बंगालमध्ये आदिवासींना एखादा दाखला हवा असला तर त्यांना तलाठ्याला लाच द्यावी लागते. मात्र, आम्ही हे निश्चित केलंय की, आदिवासींसाठी ऑनलाईन दाखले उपलब्ध करुन लाच संपवून टाकू. लघू आणि भूमिहीन शेतकऱ्यांच्या मुला-मुलींच्या शिक्षणाचा खर्च भाजपचं सरकार उचलणार आहे. जंगलमहल, झारग्राम आणि गरीब भागात आता ५ रुपयांत चांगलं जेवण देण्याची व्यवस्था भाजपचं सरकार करणार आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LSG vs DC Live: दिल्ली कॅपिटल्सचा दबदबा, रिषभ पंतच्या संघाची निघाली हवा; अक्षर पटेलच्या नेतृत्त्वाची जबदरस्त झलक, समोर माफक लक्ष्य

Donald Trump: ''आम्ही इराणवरचे हल्ले थांबवू शकतो, पण इस्रायल...'', डोनाल्ड ट्रम्प माघार घेण्याच्या तयारीत, उद्या काय बोलणार?

Thane News: ठाण्यात नेमकं चाललंय काय! २ अल्पवयीन मुली बेपत्ता, अज्ञातांनी फूस लावून अपहरण केल्याचा संशय; गुन्हे दाखल

Latest Marathi News Live Update : हडपसर-मांजरी-मगरपट्टा-महंमदवाडी परिसरात दीड तास पाऊस

Mhada House: म्हाडाच्या घरासाठी मुंबईकरांची झुंबड, दोन दिवसांत ३,३६२ अर्ज, निकाल कधी लागणार?

SCROLL FOR NEXT