Mamata-Banerjee 
देश

ममतांनी नंदीग्राममधून भरला अर्ज; सुवेंदू म्हणाले, "मतदानही करु शकत नाहीत"

सकाळ डिजिटल टीम

नवी दिल्ली

West Bengal Election 2021: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम (Nandigram) येथून आज आपला निवडणूक अर्ज भरला. तत्पूर्वी सुवेंदू अधिकारी यांनी ममतांवर टीकास्त्र सोडलं आणि बाहेरची व्यक्ती असल्याचा दावा केला. 

अर्ज भरल्यानंतर जनतेला भावनिक आवाहन करताना ममता म्हणाल्या, "नंदीग्राम माझ्यासाठी नवं नाही, एकवेळ मी माझं नाव विसरु शकेन पण नंदीग्रामला नाही. नंदीग्रामच्या आया, बहिणींनी मला लक्षात ठेवावं आणि बंगालमध्ये तृणमूलचाच विजय होईल हे पाहावं. मला नंदीग्रामच्या जनतेचा आशीर्वाद पाहिजे, सर्व समुदयांवर माझं एकसारखचं प्रेम आहे." 

दरम्यान, तृणमुल काँग्रेसमधून भाजपात दाखल झालेले सुवेंदू अधिकारी हे नंदीग्राममधून ममतांविरोधात १२ मार्च रोजी अर्ज भरणार आहेत. तत्पूर्वी त्यांनी आज (बुधवार) नंदीग्राममधील आपल्या निवडणूक कार्यालयाचं उद्घाटन केलं. तसेच ममतांवर टीकास्त्र सोडताना म्हणाले, "ममता या बाहेरच्या व्यक्ती आहेत त्यामुळे त्यांना इथून मतदानही करता येणार नाही" 

नंदीग्राममध्ये अर्ज भरण्यापूर्वी ममता बॅनर्जी यांनी शिवमंदिराला भेट दिली आणि तिथे पूजाअर्चा तसेच जलाभिषेक केला. तर दुसरीकडे रोड शो पूर्वी भाजपा उमेदवार सुवेंदू अधिकारी यांनी हनुमान मंदिराज जाऊन दर्शन घेतले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ranji Trophy: पृथ्वी शॉ झाला महाराष्ट्राचा कर्णधार! ऋतुराज गायकवाडला संघात स्थान का नाही? पाहा संपूर्ण टीम

Satara Girl Death : सेकंदाच्या रागात उद्ध्वस्त झालं कुटुंब! साताऱ्यात शिक्षक बापानं 17 वर्षाच्या पोरीला क्रिकेटच्या बॅटनं संपवलं; मृत्यूनंतर पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न?

पुण्यातील 'या' ठिकाणी झालेलं माहेरची साडी सिनेमाचं शुटिंग, सिनेमातील घर आठवतय का? अजूनही गाजलेलं शूटिंग लोकेशन!

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर पदवीधरमधून सतीश चव्हाण यांना राष्ट्रवादीकडून उमेदवारी जाहीर

Kalika Mata Tradition: माते, काही चूक झाली असेल तर माफ कर’; येरोळमध्ये कालिका मातेला गावात आणण्यासाठी अनोखी परंपरा, नेमकी काय आहे परंपरा?

SCROLL FOR NEXT