sharad pawar soniya gandhi.
sharad pawar soniya gandhi. 
देश

काँग्रेसचा विरोध डावलून शरद पवारांनी घेतला मोठा निर्णय

सकाळन्यूजनेटवर्क

नवी दिल्ली- काँग्रेसचा विरोध डावलून शरद पवारांनी मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पश्‍चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांच्या प्रचारासाठी जाणार आहेत. एक ते तीन एप्रिल असा त्यांचा तीन दिवसांचा प्रचारदौरा असून त्यातील एक दिवस ते ममता बॅनर्जी यांच्यासमवेत संयुक्तपणे जाहीर सभा घेतील. बिगर-भाजप व कॉंग्रेस विरहित समविचारी राजकीय पक्षांना एकत्र करण्याच्या हालचालीतील ही एक महत्त्वाची घडामोड मानली जाणार आहे. विशेष म्हणजे पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस डाव्यांसोबत निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने डाव्यांना हाती घेऊन ममतादीदींसमोर आव्हान उभे केले आहे. अशात शरद पवार ममतादींदींच्या प्रचारासाठी मैदानात उतरत असल्याने काँग्रेस नाराज होण्याची शक्यता आहे. शरद पवार ममता बॅनर्जी यांच्या प्रचाराला जाणार की नाही, याबाबत काही अंदाज व्यक्त केले जात होते. महाराष्ट्रात राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस शिवसेनेच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये एकत्र आहेत. अन्य काही राज्यात आणि राष्ट्रीय पातळीवरही हे पक्ष एकत्रितपणे काम करीत आहेत. परंतु पश्‍चिम बंगालमध्ये कॉंग्रेसने मार्क्‍सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीशी निवडणूक समझोता करून ते संयुक्तपणे निवडणूक लढत आहेत. 

केरळमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेस मार्क्‍सवाद्यांच्या डाव्या लोकशाही आघाडीबरोबर आहे. त्यामुळे पश्‍चिम बंगालमध्ये पवार ममता बॅनर्जी यांच्या प्रचाराला जाणार की नाहीत, याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती. पवारांनी बॅनर्जी यांच्या प्रचाराला जाण्याचे सूतोवाच केलेले होते परंतु निश्‍चित तारखा जाहीर होईपर्यंत त्याबाबतची उत्सुकता कायम राहिली होती.

विविध राज्यांमध्ये आणि राष्ट्रीय पातळीवर बिगर-भाजप व कॉंग्रेस विरहित समविचारी राजकीय पक्षांची आघाडी तयार करण्याची कल्पना सातत्याने चर्चिली जात आहे. परंतु ती प्रत्यक्षात आकाराला येण्याच्या हालचाली आढळून येत नव्हत्या. पश्‍चिम बंगाल निवडणुकीच्या निमित्ताने तशी शक्‍यता निर्माण होताना दिसू लागली आहे. या संभाव्य आघाडीचे शिल्पकर्ते म्हणून पवार यांच्याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे त्यांच्या या दौऱ्याला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.

संयुक्त जाहीर सभेचाही समावेश

शरद पवार १ एप्रिलला मुंबईहून कोलकत्याला प्रयाण करतील. त्याचदिवशी त्यांची डमडममध्ये जाहीर सभा होईल. २ एप्रिल रोजी तृणमूलच्या मुख्य कार्यालयात तृणमूल भवन येथे ते एका पत्रकार परिषदेस संबोधित करतील. तसेच तेथेच तृणमूल कॉंग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांबरोबर राजकीय आढावा घेतील. त्यानंतर लोकसभेतील तृणमूल गटनेते खासदार सुदीप बंदोपाध्याय यांच्यासमवेत एका कार्यक्रमात ते सहभागी होतील आणि तीन तारखेला ते मुंबईला परतणार आहेत. या तीन दिवसांच्या कार्यक्रमांच्या दरम्यानच ममता बॅनर्जी यांच्या निवडणूक दौऱ्यांच्या व कार्यक्रमानुसार एका संयुक्त जाहीर सभेचे आयोजन केले जाईल. तो दिवस अद्याप निश्‍चित व्हावयाचा आहे.


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 MI vs SRH: सूर्यकुमारचं तडाखेबंद शतक अन् मुंबईचा दणदणीत विजय; वानखेडेवर हैदराबादला दिला पराभवाचा धक्का

MI vs SRH: पहिलाच सामना अन् हेडचा उडवलेला त्रिफळा, पण झाला नो-बॉल; निराश झालेल्या अंशुलला बुमराह-हार्दिकने असा दिला धीर

Mumbai News : मुंबईतील कार्यालयीन वेळेत बदल होणार? रेल्वेच्या आवाहनाला ३३ कंपन्यांचा प्रतिसाद

Abhishek Ghosalkar: घोसाळकर कुटुंबियांना सीसीटीव्ही फुटेज दाखवा; हायकोर्टाचे पोलिसांना निर्देश

Mumbai Riots: मुंबईतील 1992च्या दंगलीतील खटले निकाली काढा; सुप्रीम कोर्टाचे सरकारला निर्देश

SCROLL FOR NEXT