suvendu adhikari. 
देश

ममतांना मोठा झटका; सुवेंदु अधिकारींचे वडील आणि TMC खासदार भाजपच्या वाटेवर?

सकाळन्यूजनेटवर्क

कोलकाता- पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुका काही दिवसांवर येऊन ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राजकीय पक्षांनी आणि नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. शिवाय राजकीय हालचालींनाही वेग आला आहे. तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या नंदीग्राम विधानसभा मतदारासंघातून निवडणूक लढवणार आहेत. त्यांच्याविरोधात कधीकाळी त्यांचे सहकारी असणारे आणि सध्या भाजपवासी झालेले सुवेंदु अधिकारी मैदानात आहेत. सुवेंदु अधिकारी ममतादीदी यांच्यामध्ये अटीतटीचा सामना होईल, असं सांगितलं आहे. त्यातच सुवेंदु यांनी महत्त्वाचे वक्तव्य केलंय. विधानसभा निवडणुकीसाठी त्यांचे वडील आणि तृणमूल काँग्रेसचे खासदार सिसिर अधिकारी भाजपचा प्रचार करतील, असं ते म्हणाले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. वृत्त एजेन्सी एएनआयने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. 

सिसिस अधिकारी भारतीय जनता पक्षाला पाठिंबा देतील. ते या भागातील वरिष्ठ नेते आहेत, असं सुवेंदु अधिकारी म्हणाले. त्यांनी याआधी सांगितलं होतं की,  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शनिवारी होणाऱ्या सभेसाठी त्यांचे वडील सिसिर अधिकारी उपस्थित राहतील. तृणमूलचे खासदार सिसिर अधिकारी यांनी म्हटलं होतं की, पंतप्रधान नरेंद्र यांच्या 20 मार्चला होणाऱ्या सभेसाठी मला निमंत्रण पाठवण्यात आले, तर मी उपस्थित राहीन. मिळालेल्या माहितीनुसार, सिसिर अधिकारी आणि तृणमूल काँग्रेसचे संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणले गेले आहेत. अधिकारी यांच्या दोन मुलांनी सुवेंदु आणि सौमेंदु यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यांचे आणखी एक पुत्र दिबेंदु तृणमूलचे खासदार आहेत. 

सिसिर अधिकारी हे कांती लोकसभा मतदारसंघातून खासदार आहेत. त्यांनी उघडपणे तृणमूलचे नेते सुवेंदु यांच्यावर हल्लाबोल करत असल्याचा आरोप केला होता. तसेच मुलाला वाचवण्यासाठी काहीही करायला तयार आहे, असं त्यांनी म्हटलं होतं. भाजप खासदार लॉकेट चॅटर्जी यांनी सिसिर यांच्या निवासस्थाळाला भेट दिली होती. त्यांच्या या भेटीमुळे चर्चांना उधाण आलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या पूर्वसंधेला सिसिर कॅम्प बदलतील का, अशी जोरदार चर्चा होत आहे. सिसिर अधिकारी पंतप्रधान मोदींच्या सभेदरम्यान भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी दाट शक्यता व्यक्त केली जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Maharashtra SSC Exam 2027 : दहावीच्या विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा! बोर्ड परीक्षेच्या तारखा जाहीर, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

IND vs AFG 3rd T20I: इथे-तिथे-सगळीकडे राशिद खान... भन्नाट रन आऊट अन् दोन अविश्वसनीय झेलने फिरवली मॅच; Video Viral

US OPT Fee : अमेरिकेत शिक्षणानंतर नोकरी करण्याचा मार्ग महागणार? द्यावे लागणार एक कोटींचे OPT शुल्क, भारतीय विद्यार्थ्यांवर मोठा परिणाम

Eknath Shinde Dare Village : शिवसेना पक्ष-धनुष्यबाण चिन्हाबाबत सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू असतानाच, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे थेट दरे गावात दाखल

SCROLL FOR NEXT