mamta banarjee. 
देश

ममतादीदी ऑन फायर! भर उन्हात म्हणताय 'खेला होबे'

सकाळन्यूजनेटवर्क

कोलकाता- पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीतील पहिल्या टप्प्यातील मदतान पार पडले असून आता दुसऱ्या टप्प्यातील लढतीला सुरुवात झाली आहे. सोमवारी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी आपला निवडणूक मतदारसंघ नंदीग्राममध्ये व्हिलचेअरवरुन रोड शो केला. या 'रोड शो'ला हजारो लोकांनी उपस्थिती लावली होती. ममता सोमवारी खुदीराम रोड ते नंदीग्रामच्या ब्लॉक-२ पर्यंत रोड शो केला. यावेळी भर उन्हात त्या व्हिलचेअरवरुन प्रचार करताना दिसल्या. कथितरीत्या झालेल्या हल्ल्यात ममता बॅनर्जी जखमी झाल्या आहेत. यामुळे त्यांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना व्हिलचेअरचे सहाय्य घ्यावे लागत आहे. अशा परिस्थितीतही त्यांनी वरुन सूर्य आग ओकत असताना प्रचार केला. 

तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी नंदीग्राम मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांना भाजपचे सुवेंद्र अधिकारी यांनी आवाहन दिलं आहे. सुवेंद्र अधिकारी हे ममता यांचे कधीकाळी सहकारी होते. त्यांनी निवडणुकीच्या पुढ्यात भाजपमध्ये प्रवेश केला. त्यामुळे या दोघांच्या लढतीकडे सर्व देशाचे लक्ष लागले आहे. ममतांना पुन्हा एकदा सत्तेत येण्याची संधी आहे, पण भाजपने त्यांच्यासमोर कडवे आव्हान उभे केले आहे. भाजप आणि तृणमूलकडून जोरदार प्रचार केला जातोय. काही ठिकाणी दोघांमध्ये हिंसक संघर्ष झाल्याचेही पाहायला मिळाले.

दुसऱ्या टप्प्यातील मतदान १ एप्रिलपासून सुरु होतंय. पश्चिम बंगालमध्ये आठ टप्प्यात निवडणुका होणार आहेत. सुवेंदु अधिकारी यांनी आव्हान दिलंय की, ते ममता बॅनर्जी यांना नंदीग्राममध्ये ५० हजार मतांच्या फरकाने मात देतील. मंगळवारी गृहमंत्री अमित शहा सुवेंद्र अधिकारी यांच्यासाठी रोड शो करतील. नुकतेच भाजपमध्ये प्रवेश केलेले बॉलिवूड अभिनेते मिथुन चक्रवर्ती हेही नंदीग्राममध्ये प्रचार करताना पाहायला मिळण्याची शक्यता आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ऐनवेळी पायलट का बदलले? मुंबईत CCTVमध्ये काय दिसलं? अजितदादांच्या अपघात प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी सगळंच सांगितंल

Madha News : माढ्याचा आठवडा बाजार आता हायटेक आणि शिस्तबद्ध! कार्यकर्त्यांच्या 'फिल्डिंग'मुळे वाहतूक कोंडीला ब्रेक, महिला व वृद्धांकडून कौतुक

राज्य सरकारची मोठी घोषणा! २६ आणि २७ मार्चला रामनवमीनिमित्त सार्वजनिक सुट्टी जाहीर; पण कुणाला? जाणून घ्या...

Madha News : माढ्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार! ५२ कोटींच्या पाणीपुरवठा योजनेसाठी नगराध्यक्षा मीनल साठे यांचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांना साकडे

कर्नाटकला अधिकारच नाही, ही तर महाराष्ट्राची मानहानी; अजित पवार अपघात प्रकरणी FIR वर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टच सांगितलं

SCROLL FOR NEXT