west bengal bjp.jpg 
देश

बंगालमध्ये भाजपच्या मोर्चाला हिंसक वळण, पोलिसांचा कार्यकर्त्यांवर लाठीचार्ज

सकाळ वृत्तसेवा

कोलकाता- कोलकाता येथील रस्त्यावर आज (दि.8) भाजप कार्यकर्ते आणि पश्चिम बंगाल पोलिसांमध्ये संघर्ष झाला. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यालयाच्या दिशेने निघालेल्या मोर्चाला पोलिसांनी बॅरिकेड्स लावून अडवण्याचा प्रयत्न केल्यानंतर हिंसक वळण लागले. मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयाकडे निघालेल्या भाजप कार्यकर्त्यांविरोधात पोलिसांनी अश्रूधूर आणि पाण्याचा मारा केला. भाजपकडून आज राज्यभर 'नाबन्ना चलो' आंदोलन पुकारण्यात आले आहे. 

राज्यातील ढासळत्या कायदा-सुव्यवस्थेचा निषेध नोंदवण्यासाठी गुरुवारी कोलकाता, हावडा येथून भाजपचे हजारो कार्यकर्ते नाबान्नाच्या दिशेने निघाले होते. बंगाल पोलिसांनी हा मार्च मध्येच अडवला. भाजप कार्यकर्ते बॅरिकेड हटवून पुढे जाण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळी पोलिसांनी मोर्चावर लाठीचार्ज सुरु केला.

भाजप नेत्यांनी पोलिसांवरच आरोप केला आहे. आमचे कार्यकर्ते शांततेत मोर्चा घेऊन जात होते. कार्यकर्त्यांवर दगडफेक करण्यात आली. ममता सरकारने जाणूनबुजून आमच्या लोकांवर लाठीचार्ज केला, असा आरोप भाजपने केला. पोलिसांबरोबर झालेल्या या संघर्षात भाजपचे अनेक नेते जखमी झाले. 

हावडा जिल्ह्यातील संत्रागच्ची येथे भाजपा कार्यकर्त्यांना पांगवण्यासाठी पाण्याचा जोरदार फवारा मारण्यात आला, अश्रूधुराच्या नळकांडया फोडण्यात आल्या. प्रदेश भाजप उपाध्यक्ष राजू बॅनर्जी आणि खासदार ज्योर्तिमय सिंह माहातो जखमी झाल्याचे समजते.

भाजप युवा मोर्चाचे नवे प्रमुख तेजस्वी सूर्या खास या आंदोलनात सहभागी होण्यासाठी कोलकाता येथे दाखल झाले होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर, सह्याद्री आणि गोदावरी एक्सप्रेस बंद; महाराष्ट्रातील ट्रेन सेवा कमी, यूपी-बिहारसाठी स्पेशल गाड्यांचा पाऊस

UP: योगींचे लाडक्या बहिणींना 'गिफ्ट'! हजारो जणींना नियुक्ती पत्रे; पुढच्या महिन्यापासून पगार सुरू, जाणून घ्या काय आहे खास?

Hingoli News: रब्बी उत्पादकांना दिलासा; ई-पीक पाहणीसाठी ३१ मार्चपर्यंत मुदतवाढ; शेवटची संधी

Latest Marathi News Live Update : शेअर बाजारात सेन्सेक्स 1,800 अंकांनी कोसळला

Pune Passport News: मुंढव्यातील पासपोर्ट कार्यालय पाषाणला; नवीन ठिकाणाहून ३० मार्चपासून सेवा, पुणे व परिसरातील नागरिकांना दिलासा!

SCROLL FOR NEXT